Clothes Cleaning Tips : लिंबू, टुथपेस्ट अन् बरंच काही! आता कपड्यांवरचे हळदीचे डाग होणार दूर!

डाग त्याच कपड्यांवर पडतात जे तुमचे फेवरेट असतात, म्हणूनच त्यांची काळजी घ्या!
Clothes Cleaning Tips
Clothes Cleaning Tipsesakal
Updated on

Turmeric Stains Solution : हलक्या रंगाच्या कपड्यांवरील हट्टी डाग काढणे इतके सोपे नाही, म्हणूनच बरेच लोक गडद रंगाचे पोशाख घालणे पसंत करतात. पावसाळ्यात तर कोणताही डाग पडला की तो पाण्यात भिजल्याने जास्त पसरतो.

काही लोकांना हलक्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून तीव्र सूर्यप्रकाशाचा परिणाम शरीरावर जास्त होऊ नये, परंतु अन्न खाताना किंवा शिजवताना अनेकदा कपड्यांवर हळदीचे डाग पडतात, ज्यापासून सुटका होणे कठीण असते.

लग्नकार्यात तर हमखास हळदीच्या कार्यक्रमात कपडे घाण होतातच. घाई गडबडीत आपल्या कपड्यांवर हळदीचे डाग पडलेले असतील तर हि माहिती आपल्यासाठीच आहे. आज आम्ही असे काही या उपायांनी कपड्यांवरील हळदीचे डाग अगदी सहज दूर होतील.(Turmeric Stains Solution : Turmeric stains on light colored clothes, these measures will remove stubborn spots)

Clothes Cleaning Tips
Cloths Bad Smell : पावसाळ्यात कपड्यांना येणारा कुबट वास घालवा झटकन! जाणून घ्या या टिप्स पटकन....

हळदीचा डाग हट्टी असतो

हळदीचा रंग गडद असून तो कपड्यांवर लावल्यास त्याचे रूपांतर जाड थरात होते. पांढऱ्या कुर्ता, शर्ट किंवा पँटवर हळद लावल्यास काळजी करण्याची गरज नाही, सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही डागांपासून मुक्ती मिळवू शकता.

व्हिनेगर

व्हाईट व्हिनेगरचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो, पण त्याचा वापर कपडे स्वच्छ करण्यासाठीही करता येतो. लिक्विड साबणामध्ये व्हिनेगर मिसळा आणि हळदीचा डाग असलेल्या ठिकाणी लावा, सुमारे अर्धा तास कोरडे होण्याची प्रतीक्षा करा आणि नंतर धुवा. (Cloths Cleaning Tips)

Clothes Cleaning Tips
Turmeric Benefits: नाभीवर हळद लावल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या होतील दूर, काय आहे महत्व?

टूथपेस्ट

टूथपेस्टचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो, परंतु टूथपेस्टचा वापर जिद्दीचे डाग दूर करण्यासाठी खूप कमी लोकांना माहिती असेल. डाग असलेल्या भागावर घासून नंतर थोडावेळ कोरडे राहू द्या, शेवटी स्वच्छ पाण्याने धुवा.

लिंबू

अनेकवेळा आपण घराबाहेरचे अन्न खात असतो आणि पांढऱ्या कपड्यावर भाजी किंवा हळदीचा डाग पडला तर डिटर्जंट शोधणे कठीण होते. अशावेळी प्रभावित भागात लिंबू चोळा किंवा त्याचे थेंब डागावर टाका आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा. (Cleaning Tips In Marathi)

Clothes Cleaning Tips
Turmeric Detox Water : बॉडी डिटॉक्स करणाऱ्या हळदीचं पाणी रोज पिणं योग्य आहे का? तज्ज्ञ सांगतात...

थंड पाणी

पांढऱ्या किंवा हलक्या कपड्यावर हळदीचा डाग असल्यास सर्वप्रथम थंड पाण्यात बुडवून डिटर्जंटमध्ये काही वेळ धुवा. थंड पाण्याच्या प्रभावामुळे अगदी कडक डाग हलके होतात. बर्याच लोकांना असे वाटते की गरम पाण्याचा डागांवर चांगला परिणाम होतो, परंतु सत्य उलट आहे. (Turmeric)

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा वापरून आपल्याला हळदीचे डाग काढता येऊ शकतात. बेकिंग सोड्याचा वापर केल्याने कपड्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. कपड्यांवरील हळदीचे डाग घालवण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळा. नंतर डाग असलेल्या भागावर लावा. काही वेळ असेच राहू द्या आणि नंतर मऊ ब्रशच्या मदतीने घासून घ्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()