Coconut Husk : नारळाच्या शेंडीला कचरा समजून फेकू नका, आहे बहुगुणी येईल अनेक कामी

नारळाच्या शेंडीपासून कोकोपीठ करता येत
Coconut Husk : नारळाच्या शेंडीला कचरा समजून फेकू नका, आहे बहुगुणी येईल अनेक कामी
Updated on

Coconut Husk :

प्रत्येकाच्या घरी नारळ फोडले जातात. नारळातलं खोबरं, पाणी याचा आपल्याला अनेक प्रकारे फायदा होता. कवठ्यांचा यांचा वापर कसा करायचा हे तर तुम्हाला माहिती आहे. पण नारळाच्या शेंड्यांही अनेक प्रकारे तुमच्या उपयोगी पडू शकतात.

प्रत्येकजण नारळ घेतो अन् कवठ, शेंड्या फेकून देतात. काही ठिकाणी नारळांच्या कवठ्यांपासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. ग्रामिण भागात या शेंड्या जळणासाठी भांडी घासण्यासाठी वापरला जातो.पण नारळाच्या शेंड्यांचा म्हणावा तसा वापर केला जात नाही. शहरी भागात तर त्या फेकूनच दिल्या जातात. (Coconut)

Coconut Husk : नारळाच्या शेंडीला कचरा समजून फेकू नका, आहे बहुगुणी येईल अनेक कामी
Coconut: कधी पाणी जास्त हवं असतं तर कधी मलई, या आहेत योग्य नारळ विकत घ्यायच्या टिप्स

ढिगभर सोललेल्या नारळांच्या शेंड्या असतील तर त्याचं करायचं काय? ते करच्यात टाकण्याचा विचार करत असाल. तर, थांबा आम्ही आज तुम्हाला अनेक अशा गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुमच्या अनेक कामी येतील.

नारळाच्या शेंड्यांचे कोकोपीठ

नारळाच्या शेंडीपासून कोकोपीठ करता येत. हे कोकोपीठ तुम्ही झाडांमध्ये टाकल्यास झाडांना तरतरी येते. ती अधिक फळ,फुलं देतात. हे कोकोपीठ बाजारात तयार मिळतं. पण तुम्ही विकत आणू नका. नारळाच्या शेंड्यांपासून तुम्ही घरीच ते बनवू शकता. (Cocobut Husk)

नारळाच्या शेंड्या वाळवून घ्या, त्या कात्रीने बारीक कापून घ्या. आणि मिक्सरमध्ये घालून त्यांची पावडर बनवून घ्या. आता या पावडरमध्ये थोडे थोडे पाणी घालून त्या पावडरीचे गोळे बनवून घ्या. जेव्हा कधी तुम्ही एखादे झाड कुंडीत लावाल तेव्हा हे गोळे त्यामध्ये पसरून लावा.

Coconut Husk : नारळाच्या शेंडीला कचरा समजून फेकू नका, आहे बहुगुणी येईल अनेक कामी
Coconut Water Side Effects: नारळपाणी पिण्याचे आहेत अनेक तोटे, या लोकांनी घ्यावी खास काळजी,नाहीतर...

शेंडीपासून बनवा ब्रश

नारळाची शेंडी तूम्ही एखाद्या ब्रश सारखी वापरू शखता. घावणं करण्यासाठी, किंवा आंबोळी, डोश्याच्या तव्याला तेल लावण्यासाठी याचा चांगला वापर होऊ शकतो.

खिडकी स्वच्छ करा

नारळाची शेंडी एकसारखी कापून घ्या आणि एका काठीला दोरीच्या आधारे बांधून घ्या. ही स्टीक तुम्ही खिडक्यांच्या गजांमधील धूळ साफ करण्यासाठी वापरू शकता. तसेच, अशाचप्रकारे मोठ्या काठीला जास्त शेंडी लावून तुम्ही घराच्या छतावरील जाळ्या, जळमटही काढू शकता. (Kitchen Tips)

Coconut Husk : नारळाच्या शेंडीला कचरा समजून फेकू नका, आहे बहुगुणी येईल अनेक कामी
Coconut Water For Hairs : केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे नारळाचे पाणी, अशा पद्धतीने करा वापर

पावसाळ्यातील चिलटं घालवा

नारळाच्या शेंड्यांचा धूर घरी केल्यास घरातील हवा शुद्ध होते. अन् पावसाळ्यात उन्हाळ्यात माशा, चिलट्यांचा प्रादुर्भाव वाढतो. तर तोही या धुरामुळे कमी होतो.

मेहंदीमध्ये घाला

नारळाच्या शेंड्या जाळून राख केल्यास ती राख तुमच्या मेहंदी पावडरमध्ये घाला. ज्यामुळे तुमच्या केसांना वेगळीच चमक होते.  तसेच काळी राख पांढऱ्य केसांना काळे कुळकुळीत करेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.