Constipation home remedies : हे तीन ज्युस प्या आणि बद्धकोष्टतेला रामराम करा!

तेलकट-मसालेदार, प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूडचे जास्त सेवन केल्यानेही असा त्रास होतो
Constipation home remedies
Constipation home remediesesakal
Updated on

Constipation home remedies : बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या वाढली आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत या समस्येने त्रस्त आहेत. जीवनशैलीत सुधारणा आणि आहारातील बदल बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, अपचन या समस्या सामान्य झाल्या आहेत. आजकाल तरुण असोत वा वृद्ध प्रत्येक वयोगटातील लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत आहे. बहुतेक लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असतात. बद्धकोष्ठतेची समस्या कमी पाणी पिणे, अन्नामध्ये फायबर युक्त गोष्टींचा समावेश न करणे अशा अनेक कारणांमुळे होते.

तेलकट-मसालेदार, प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूडचे जास्त सेवन केल्यानेही बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठतेमुळे मल जाण्यास खूप त्रास होतो. कधीकधी ओटीपोटात पेटके, जडपणा देखील जाणवतो.

Constipation home remedies
Constipation : सकाळी पोट साफ होत नाही? हे उपाय कराल तर झटक्यात होणार समस्या दूर

अधूनमधून बद्धकोष्ठता असणे हे सामान्य आहे, परंतु पोट सतत स्वच्छ नसल्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दोन-तीन आठवडे कायम राहिल्यास इतर अनेक समस्या होऊ शकतात. यामुळे मूळव्याध किंवा रेक्टल प्रोलॅप्स, पेकल इम्पॅक्शन, गुदद्वारावरील फिशर यांसारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागते.

निरोगी खाण्याच्या सवयींनीच तुम्ही बद्धकोष्ठतेपासून मुक्त होऊ शकता. यासाठी अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे, जे पचनशक्ती मजबूत करतात. चला, आज आम्ही तुम्हाला अशाच काही हेल्दी ज्यूसबद्दल सांगत आहोत, ज्याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते.

Constipation home remedies
Women Health : कोरफडीमुळे महिलांना होतात हे फायदे

बद्धकोष्टतेची लक्षणे कोणती

बद्धकोष्ठतेची कारणे

कोणत्याही समस्येचे निराकरण जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम त्याची कारणे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर आधी जाणून घ्या की बद्धकोष्ठतेची समस्या कशामुळे होते.

-अन्नामध्ये फायबरची कमतरता म्हणजेच तंतुमय अन्न न खाणे.

- तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे.

- पाणी किंवा द्रवपदार्थाचे सेवन कमी करणे.

- वेळेवर न जेवणे.

- रात्री उशिरा खाणे.

- जागरण.

- चहा, कॉफी, तंबाखू किंवा सिगारेटचे जास्त सेवन केल्यास बद्धकोष्ठता होऊ शकते.

- भूक नसतानाही अन्न खाणे.

- खूप तणाव किंवा चिंतेखाली असणे.

- हार्मोनल असंतुलन आणि थायरॉईडमुळे देखील बद्धकोष्ठता होऊ शकते.

- दीर्घकाळापर्यंत खूप वेदनाशामक औषधे घेतल्यानेही बद्धकोष्ठता होऊ शकते.

Constipation home remedies
Constipation : सकाळी पोट साफ होत नाही? हे उपाय कराल तर झटक्यात होणार समस्या दूर

सफरचंदाचा रस: हेल्थलाइनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार सफरचंदाच्या रसामध्ये रेचक प्रभाव असतो, ज्यामुळे मुलांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि सॉर्बिटॉलचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. मात्र, सफरचंदाचा रस जास्त प्रमाणात पिणे टाळावे, मात्र त्याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

लिंबाचा रस: जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल आणि त्यापासून त्वरित सुटका हवी असेल तर लिंबाचा रस खूप फायदेशीर ठरू शकतो. अर्ध्या लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या.

Constipation home remedies
Constipation : ही आहेत बद्धकोष्ठतेची कारणे; या घरगुती उपायांनी करा समस्या दूर

पिअरचा रस: बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही पिअरचा रस देखील पिऊ शकता. त्यात सफरचंदाच्या रसापेक्षा चारपट जास्त सॉर्बिटॉल असते. ज्या मुलांना बद्धकोष्ठतेची तक्रार आहे, त्यांनाही या फळापासून तयार केलेला रस पिण्याचा सल्ला दिला जातो. पेअर ज्यूसची चव लहान मुलांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल.

याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होईल. यासोबतच रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध किंवा कोणतेही कोमट द्रव प्यायल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. बद्धकोष्ठतेची समस्या पूर्णपणे बरी होईपर्यंत कार्बोनेटेड पेयांपासून शक्यतो दूर राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.