Monsoon Care: दूषित अन्न, पाण्याचे सेवन ठरते डायरिया, कावीळचे कारण; तज्ज्ञांची माहिती

Monsoon Care: आजकाल धावपळीच्या आयुष्यात घरच्या जेवणापेक्षा बाहेरच्या जेवणाकडे अनेकांचा कल वाढला आहे. काहीवेळा पर्याय नसल्याने हे करावे लागते. अशा परिस्थितीत दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन झाल्यास उलटी, मळमळ, अतिसार, पोटात दुखणे, ताप अशी लक्षणे आढळतात.
Health Care
Health CareSakal
Updated on

Monsoon Care: पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, टायफॉइड, कावीळ या आजाराचे रुग्णदेखील मोठ्या प्रमाणावर आढळतात. दूषित पाणी किंवा अन्नाचे सेवन हे यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आजकाल धावपळीच्या आयुष्यात घरच्या जेवणापेक्षा बाहेरच्या जेवणाकडे अनेकांचा कल वाढला आहे. काहीवेळा पर्याय नसल्याने हे करावे लागते. अशा परिस्थितीत दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन झाल्यास उलटी, मळमळ, अतिसार, पोटात दुखणे, ताप अशी लक्षणे आढळतात. काही वेळा कावीळ झाल्याचेदेखील निदर्शनास येते. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते.

मुले आणि वृद्धांमध्ये वाढते प्रमाण

विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्यामध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसते. यातील टायफॉइड आजार पावसाळाच नव्हे तर कुठल्याही ऋतूमध्ये होतो. परंतु, पावसाळ्यात याचे रुग्ण वाढतात. यामुळे पावसाच्या दिवसात खानपानाबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.

काय आहेत कारणे?

बाहेरच्या अन्नपदार्थांचे सेवन करणे

घरात न धुताच भाज्यांचा वापर

दूषित पाणी पिणे

अशी घ्या काळजी

बाहेरचे अन्न घेणे टाळावे

उकळून थंड केलेले पाणी पिणे

भाज्या घेतल्यानंतर घरातील पाण्याने

स्वच्छ धुवाव्यात

खिडक्यांना जाळी बसवा.

शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घाला.

Health Care
Monsoon Care: पावसाळा आणि रोगप्रतिकार शक्ती

पावसाळ्याच्या दिवसांत उलटी, पोटात दुखणे, ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होते. सध्या बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी दहा टक्के रुग्ण या आजाराचे आढळतात. त्यामुळे योग्य काळजी घ्यावी. बाहेरचे अन्न, पाणी टाळावे.

- डॉ. आनंद देशमुख, एमडी, मेडिसिन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.