Jasmin Bhasin Eyes: कॉन्टक्ट लेन्समुळे अभिनेत्री Jasmin Bhasin ची दृष्टी गेली, जाणून घ्या, लेन्स वापरताना काय काळजी घ्यावी

Actress Jasmin Bhasin lost her sight due to contact lenses: जास्मिनने एका कार्यक्रमासाठी डोळ्यांमध्ये कॉन्टक्ट लेन्स घातल्या होत्या. पण, त्या घातल्यानंतर लगेचच तिला त्रास होऊ लागला.
Jasmin Bhasin Eyes
Jasmin Bhasin Eyesesakal
Updated on

Jasmin Bhasin Eyes :

मनोरंजन विश्वातील अभिनेत्री जास्मिन भसीन हिच्या एका चुकीमुळे तिची दृष्टी गेली आहे. जास्मिनने एका कार्यक्रमासाठी डोळ्यांवर लेन्स घातल्या होत्या. त्याचा गंभीर परिणाम तिला भोगावा लागत आहे. कारण, जास्मिनच्या डोळ्यातील कॉर्नियाला दुखापत झाली असून तिला दिसणंही बंद झालं आहे.

सध्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले आहेत. असं सांगितलं जातं आहे की, जास्मिनने एका कार्यक्रमासाठी डोळ्यांमध्ये कॉन्टक्ट लेन्स घातल्या होत्या. पण, त्या घातल्यानंतर लगेचच तिला त्रास होऊ लागला. तिने काहीवेळ लेन्स घालून पुन्हा चष्मा वापरून कार्यक्रम संपवला. मात्र, त्यानंतर तिला भयंकर त्रासाला सामोरे जावे लागले. (Jasmin Bhasin)

‘मला खूप वेदना होत आहेत. येत्या चार-पाच दिवसांत मी बरी होईन, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण तोपर्यंत मला माझ्या डोळ्यांची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, मला काहीच दिसत नाहीये. डोळ्यांत होणाऱ्या वेदनांमुळे झोपणे देखील कठीण झाले आहे, असे जास्मिनने म्हटले आहे.

Jasmin Bhasin Eyes
Actress Lost Eyesite: एक चूक महागात पडली! लोकप्रिय अभिनेत्रीच्या कॉर्नियाला दुखापत; डोळ्यांनी दिसणंच झालं बंद

सध्या कॉन्टक्ट लेन्सचा ट्रेंड आहे. चष्मा वापरणे आऊटडेटेड वाटतं. त्यामुळे, लोक लेन्सचा वापर जास्त करत आहेत. पण, या लेन्स वापरताना काय काळजी घ्यावी याची माहिती घेऊयात.

कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपू नये

कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपल्यास डोळ्यांच्या संसर्गाचा धोका ७-९ पटीने वाढतो. नेत्ररोग तज्ञ सांगतात की, झोपण्यापूर्वी लेन्स काढून टाकण्याची शिफारस करतात, कारण ते परिधान केल्याने संसर्ग, चिडचिड आणि कॉर्नियल इजा होण्याचा धोका वाढतो.

जेव्हा तुमचे डोळे बंद असतात, तेव्हा कमी ऑक्सिजन त्यांच्यापर्यंत पोहोचतो, ज्यामुळे तुमचे डोळे संक्रमणास अधिक संवेदनशील बनतात. पापण्यांमुळे ही समस्या आणखी वाढू शकते कारण बंद पापण्या तुमच्या डोळ्यांजवळील जंतू, बॅक्टेरिया इत्यादींच्या संपर्कात येतात आणि तुमच्या लेन्सेस संक्रमित करू शकतात.

Jasmin Bhasin Eyes
भोली सी सूरत आँखों में मस्ती अन् हसती जास्मिन Jasmin Bhasin

पोहताना लेन्स वापरू नयेत

पोहताना गॉगलच्या खाली कॉन्टॅक्ट लेन्स घातल्याने डोळ्यांच्या संसर्गाचा धोका देखील असू शकतो, विशेषत: चांगला सील नसल्यास. जोपर्यंत डोळ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. आंघोळ करणे हे कॉन्टॅक्ट लेन्ससह पोहण्याइतकेच धोकादायक असू शकते, कारण नळाच्या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि त्यात सूक्ष्मजीव असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात.

Jasmin Bhasin Eyes
Monsoon Eye Care : पावसाळ्यात डोळ्यांसाठी कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना 'अशी' घ्या काळजी

कॉन्टॅक्ट लेन्स स्वच्छ कसे करावे?

कॉन्टॅक्ट लेन्स स्वच्छ करण्यासाठी खारट लिक्वीडचा वापर कधीही वापरू नये, कारण ते तुमच्या लेन्सचे निर्जंतुकीकरण करू शकत नाही. तुमचे कॉन्टॅक्ट लेन्स साफ करणे, स्वच्छ धुणे, निर्जंतुक करणे इतर उपाय करावेत. तुम्ही दररोज लेन्स क्लिन करता त्यासाठी खास लिक्वीड मिळते. त्यांना स्वच्छ लेन्सच्या केसमध्ये ठेवा आणि त्यामध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण द्रावण घाला.

जे लोक कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर दर तीन महिन्यांनी लेन्स बदलत राहावे. त्याहून अधिक काळ जर तुम्ही एखादी लेन्स वापरत असाल तर मात्र डोळ्यांना इजा होऊ शकते.

Jasmin Bhasin Eyes
Jasmin Bhasin Hospitalized: बिग बॉस फेम जस्मिन रुग्णालयात दाखल! प्रकृती चिंताजनक

तर लगेचच काढा लेन्स

जास्त वेळ कॉन्टॅक्ट लेन्स घातल्याने तुमचे डोळ्यात जळजळ व्हायला लागली तर लगेचच लेन्स काढा. तुम्हाला लेन्सची ऍलर्जी असेल तरी देखील लेन्स वापरणे टाळा. काहीवेळा लेन्स आणि धुळीचा संबंध आल्यानेही डोळ्यांमध्ये वेदना होऊ शकतात. तेव्हा पटकन लेन्स काढा.

Jasmin Bhasin Eyes
अभिनेत्रीची दृष्टी गेली... कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना टाळा या चूका

इतरांच्या लेन्स वापरू नका

काही लोक इतरांचे कपडे वापरतात तसे इतरांचे लेन्सही वापरू शकतात. पण, तुम्ही अशी चूक करू नका. यामुळे इन्फेक्शन पसरू शकते. तुम्ही स्वत:साठी घेतलेल्या आणि चांगली क्वालिटी असलेल्याच लेन्सची निवड करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.