Cooking Hacks : स्वयंपाकात भरपूर वेळ जातो? या किचन हॅक्स तुमच्या कुकींगला परफेक्ट बनवण्याबरोबरच वेळेचीही बचत करतात

आज आपण किचनमध्ये वेळेची बचत करणाऱ्या काही एक्सपर्ट टिप्स जाणून घेऊया
Cooking Hacks
Cooking Hacks esakal
Updated on

Cooking Hacks : किचनमध्ये जेवण बनवताना एखादी चूक झाली की स्वयंपाकाचं काम आणखी वाढतं. आणि वेळही फार जातो. तुमच्यासोबतही असे वारंवार घडत असेल तर आज आपण किचनमध्ये वेळेची बचत करणाऱ्या काही एक्सपर्ट टिप्स जाणून घेऊया. ज्यामुळे किचनमध्ये तुमच्या वेळेची नक्कीच बचत होईल. आणि स्वयंपाकही झटपट होईल.

एक्सपर्टच्या या कुकींग टिप्स तुमच्या कुकींगला बनवेल सुपर ईजी आणि टेस्टी

फाटलेल्या दूधाचे पाणी वाया घालू नका. त्याचा कणीक मळण्यासाठी वापर करा. असे केल्यास तुमचा पराठा किंवा चपाती सॉफ्ट आणि टेस्टी होईल.

पकोडे बनवताना त्यात छोडेसे तांदळाचे पीठ घातल्यास पकोडे क्रिस्पी बनतात.

शिळे ब्रेड ग्रायंडरमध्ये बारीक करून एयरटाइट डब्ब्यात स्टोअर करून ठेवा. या ब्रेड क्रंब्सचा वापर तुम्ही कटलेट किंवा कबाब बनवताना करू शकता.

कुठलीही स्वीट डिश बनवताना त्यात एक चिमूट मीठ मिसळल्यास त्याची चव आणखी वाढते. (lifestyle)

Cooking Hacks
Kitchen Tips : दुष्काळात तेरावा महिना! महाग झालेले टोमॅटो पावसाळ्यात होतायत खराब; अशी करा साठवणूक

भात मोकळा बनवण्यासाठी त्यात १ चमचा तूप किंवा लिंबाचा रस मिसळा.

ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदा भाजताना त्यात अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमलाज असल्यामुळे ग्रेव्हीला चांगला कलर आणि चव येईल.

भेंडी चिकट झाल्यास ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला, यामुळे भेंडीचा चिकटपणा जाईल. (kitchen Tips)

पुऱ्या तळण्याआधी पुऱ्या लाटून दहा मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने तळताना त्या जास्त तेल शोशून घेणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.