Clay Pot Benefits: आज स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे व भांडी बाजारात उपलब्ध आहेत. या उपकरणातून काम जरी पटकन होत असले तरी त्याचा शरीराला फायदा होईलच, हे सांगता येत नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे रोज स्वयंपाक करण्यासाठी वापरली जाणारी भांडी.
नेहमीच्या अॅल्युमिनिअमच्या किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक पटकन होतो. पण आरोग्याचे काय? मातीची भांडी वापरल्यास आरोग्यास ते लाभदायक ठरते. त्यामुळेच स्टील, पितळ आणि अॅल्युमिनिअमच्या भांड्यांची चलती असतानाही मातीच्या भांड्यांचीही ''क्रेझ'' कायम आहे. काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये या भांड्यांचा ट्रेंड आला आहे.
मातीच्या भांड्यात जेवण केल्याने आरोग्यासाठी फायदा होतो. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळूहळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त असल्याने शंभर टक्के पोषण तत्त्वे मिळतात.
मातीच्या भांड्यांमध्ये बनवलेले जेवण अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट लागते. मातीच्या तव्यावर चपाती करताना मातीचे तत्त्व चपातीमध्ये शोषले जाते, यामुळे त्याची पौष्टिकता वाढते. तर वारंवार पोटात गॅस होत असतील तर आवर्जून मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न खावे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला साधारणपणे १८ पोषक तत्त्वांची गरज असते. मातीच्या भांड्यातून ही पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होते.
कॅल्शिअम, सल्फर, सिलिकॉन, कोबाल्ट आणि अशी अनेक तत्त्वे मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे मिळतात. पूर्वी प्रत्येक घरात फक्त मातीची भांडी वापरली जात होती. अन्न शिजविण्यासाठी, ठेवण्यासाठी आणि गरम करण्यासाठी हंडी आणि कुकरदेखील बाजारात उपलब्ध आहेत. आज ही मातीची भांडी घराघरांत तसेच उच्चभू रेस्टॉरंट्स आणि हॉटेलांमध्ये आकर्षणाचे केंद्र झाले आहेत. याविषयी कुंभारकाम करणारे किशोर गोरखोरे म्हणाले, की आजकाल सर्व प्रकारची भांडी तयार करण्यात येतात. डॉक्टर सांगतात की तुम्ही मातीच्या भांड्यांमध्ये जेवण करा, तसेच प्रत्येक घरामध्ये फ्रीज असले तरीही माठ असतोच.
माठ, सुरई : १८० ते ३०० रुपये
हंडा : १०० ते २०० रुपये
तवा : ६० ते १५० रुपये
चहाचा कप : २० ते ३० रुपये
पाण्याची बाटली : १५० ते २०० रुपये
(आकार आणि कलाकृतीनुसार)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.