Cooking Tips : चपाती गोलाकार झाली म्हणजे ती चांगलीच असे नाही, इथं आहेत चपाती मऊ लुसलुशीत बनवण्यासाठी खास टिप्स

काहीवेळा चपातीला पापडासारखा कुरकुरीतपणा येतो
Cooking Tips
Cooking Tipsesakal
Updated on

Cooking Tips :

चपाती बनवणं फार काही अवघड काम नाहीय,असे पुरूष मंडळी सहज बोलतात. कारण त्यांना हे काम सोप्प वाटतं. पण जेव्हा ते प्रयत्न करतात. तेव्हा मात्र त्यांनी लाख प्रयत्न करूनही त्यांचे प्रयत्न फसतात.

मोठी चपाती लाटून ती गोलाकार बनवली, तरी देखील ती मऊ होत नाही. वातड होते किंवा त्याला पापडासारखा कुरकुरीतपणा आलेला असतो. काहीवेळा घाईत पीठ मळतो तेव्हाही आपल्याकडून काही चुका होतात. ज्यामुळे चपाती नेहमीसारख्या मऊ,लुसलुशीत होत नाहीत. (Cooking Tips In Marathi)

Cooking Tips
Health Care News: चपाती ऐवजी या दोन पिठाच्या भाकरी खाणे आरोग्यदायक! हाडे होतील मजबूत

तर आज आपण चपातीसाठी पिठ मळताना काय करावं, ज्यामुळे चपाती मऊ होतील याबद्दलच्या  टिप्स पाहणार आहोत. शेफ पंकज भदौरिया अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर स्वयंपाकाच्या टिप्स शेअर करतात. ज्या वापरून स्वयंपाक करणे अधिक सोपे बनते.

अलीकडेच त्यांनी चपाती बनवण्याच्या अशा टिप्स शेअर केल्या आहेत, ज्या खूप उपयुक्त आहेत. त्या बद्दल आपण जाणून घेऊयात.

Cooking Tips
Healthy Food : मधुमेहाच्या रूग्णांनी चपाती बंद करून या भाकरी खाव्यात, शुगर येईल आटोक्यात

चपातीची कणिक मळताना करा या गोष्टी

  1. चपातीची कणिक मळताना प्रत्येकजण थंड पाणी वापरतो. पण, तसे न करता कोमट पाणी वापरावे. यामुळे खूप फरक पडतो.  

  2. कडक घट्ट पिठापासून चपाती बनवणे खूप अवघड आहे. काही स्त्रीया कणिक मळून ती तशीच न झाकता ठेवतात. ज्यामुळे, कणिक वाळते. त्या पिठाच्या चपाती मऊ होत नाहीत.

  3. चपाती बनवण्यापूर्वी किमान 20 ते 30 मिनिटे पीठ मळून घ्या. ताज्या पिठाच्या चपाती जास्त चविष्ट होतात. यामुळे चपाती मऊ होतात आणि फुग्यासारख्या फुगतात.

  4. कणिक मळून झाल्यानंतर आपल्या हातांनी पुन्हा एकदा पीठ मऊ करून घ्या. चपाती खूप जास्त गॅस फ्लेमवर करपतात. त्यामुळे त्या भाजताना मध्यम आचेवर भाज्याव्यात.

Cooking Tips
Health Tips : तुम्ही एक महिना चपाती खाल्लीच नाहीत तर काय होईल?

रात्रीची कणिक असेल तर...

आहार शास्त्रात रात्रीची कणिक दिवसा वापरू नये असे सांगितले जाते. पण काहीवेळा ती फेकून देणं नकोसं वाटतं. अशावेळी फ्रिजमधील कणिक मऊ होण्यासाठी बाहेर काढून ठेवा. त्यानंतर, ती हाताने मऊ करून मग त्याच्या चपाती बनवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.