कोरोना काळात चुकूनही जाऊ नका अशा ७ ठिकाणी; अन्यथा...

निष्काळजीपणा प्रत्येकालाच महागात पडू शकतो.
corona virus
corona virusfile photo
Updated on

चीनच्या वुहान प्रांतातून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात पाय पसरले आहेत. भारतातही या विषाणूने शिरकाव केला असून नुकतीच कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन करण्याचं नागरिकांना आवाहन केलं असून राज्यात कलम १४४ लागू केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असल्यामुळे नागरिकांनीदेखील स्वत:च्या आणि इतरांसाठी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या काळात अशी काही ठिकाणं आहेत, जेथे चुकीनही जाऊ नका. या ठिकाणी गेल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.

कोरोना काळात गर्दीची ठिकाणं टाळण्याचा प्रयत्न करा असं आवाहन सातत्याने प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे बाजारपेठा, लग्नकार्य, सार्वजनिक उत्सव अशा ठिकाणी गर्दी करु नका असं सक्तीचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. परंतु, हे दुर्लक्ष करणं प्रत्येकालाच महागात पडू शकतं. त्यामुळे सगळ्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही खबरदारीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यासाठीच ७ गर्दीची किंवा ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ शकतो अशी ठिकाणं टाळणं अत्यंत गरजेचं आहे.

१. स्विमिंग पूल -

उन्हाळा सुरु झाल्यामुळे प्रत्येक जण थंड हवेचं ठिकाण किंवा समुद्र किनारा अशा ठिकाणी जाण्याचा प्लॅन आखतो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता अनेकांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक जण एखादा रिसॉर्ट गाठून तेथील स्विमिंग पूलमध्ये डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. तर, मुलांना शाळेची सुट्टी लागल्यामुळे काही जण आपल्या मुलांना स्विमिंग क्लासलादेखील पाठवत आहेत. मात्र, स्विमिंग पूल किंवा अन्य कोणतेही अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, ठिकाणं टाळा. येथे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता आहे.

२. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स -

अनेक जणांना स्पोर्ट्सची विशेष आवड असते. त्यामुळे घरात बसून कंटाळलेले अनेक जण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जातांना दिसतात. क्रिकेट,फूटबॉल, टेनिस यासारख्या खेळांमधून नागरिक स्वत: फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच घरात बसून कंटाळल्यामुळे हेच एक विरंगुळ्याचं साधन असल्याचं त्यांचा समज आहे. मात्र, या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्येही जाणं टाळा. कारण, प्रत्येक जण प्रवास करुन या ठिकाणी येत असतो. त्यामुळे एकमेकांचा संपर्क आल्यामुळे कोरोनाच प्रादुर्भाव झपाट्याने वाढू शकतो.

३. पार्टी -

ब्रेक द चेन अंतर्गत आता सामुहिक लग्नसोहळा, पार्टी किंवा अन्य कोणतेही कार्यक्रम करण्यास सक्त मनाई आहे. लग्न सोहळा किंवा पार्टी म्हटल्यावर असंख्य लोक एकत्र येतात. त्यामुळे पार्टी किंवा सोहळ्यांमध्ये जाणं टाळावं.

४. बाजारपेठ किंवा मॉल -

सगळ्यात जास्त गर्दीचं ठिकाण म्हणजे बाजारपेठ आणि मॉल. दररोज असंख्य लोक खरेदीसाठी येथे येत असतात. त्यामुळे सहाजिकच गर्दीच्या ठिकाणी कोरोना झपाट्याने पसरतो. त्यामुळे ही ठिकाणं टाळावीत.

५. जीम किंवा फिटनेस सेंटर -

जीम किंवा फिटनेस सेंटरमध्ये खासकरुन २५ ते ४० या वयोगटातील तरुण पिढी पाहायला मिळते. मात्र, कोरोना काळात जीममध्ये जाणं टाळावं आणि घरच्या घरीच वर्कआऊट करावा.

६. पार्क -

सुट्टी लागल्यावर घरात बसून कंटाळलेल्या मुलांना अनेक जण बागेत किंवा पार्कमध्ये घेऊन जातात. परंतु, या दिवसांमध्ये ही ठिकाणं आवर्जुन टाळा. कारण,सध्याच्या काळात लहान मुलांना देखील कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातल्या घरात मुलांचं मन रमेल असे खेळ त्यांना सुचवा.

७. पर्यटन स्थळे-

खरं सध्याच्या काळात कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असं वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, काही जण शहराजवळ किंवा गावाजवळ असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देत आहेत. परंतु, थंड हवेची ठिकाणं किंवा गारवा असेल अशी ठिकाणं टाळा. कारण या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता जास्त असते. ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.