Couple Goals : कोणतंही नातं असो ते तुटल की वाईट वाटतच; त्यात जर ते प्रेमाच असेल तर त्रास होतोच. एका माणसाला आपल्या मनाच्या सर्वात जवळ आणून ठेवायच त्याच्या बरोबर भविष्याची स्वप्न बघायची आणि मग एकवेळ येते जेव्हा तो आपल्याला सोडून निघून जातो.
अनेकदा आपल्यातल्या गोष्टी अचानक वर्क आउट होत नाहीयेत अशी तक्रार जोडप्यांमध्ये दिसून येते; याची अनेक कारणं असू शकतात; जसे की अचानक दोघांपैकी एकाला समोरचा व्यक्ती काही एफर्ट्स घेत नाहीये असा समज होणं, एकमेकांना कमी वेळ देणं, समजून न घेता ओव्हररिअॅक्ट करणं.
पण जेव्हा अशी वेळ येते तेव्हा आपल्या नात्याला रीफ्रेश करण्याची गरज आहे हे समजून जा. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालण्यापेक्षा समजून घ्या; समोरच्यांच्या मतांचा आदर करा. 2022 मधल्या हेल्दी आणि यशस्वी रिलेशनशिप असलेल्या लोकांचा सऱ्व्हे करण्यात आला आणि त्यात त्यांनी या गोष्टी ठळकपणे पाळल्याच दिसून आलं.
1. उगाच चिडचिड नको
रिलेशनशिप मध्ये एकमेकांना समजून घ्या, प्रत्येकावेळी समोरचा माणूस सेम विचारात असेल आणि त्याला काही त्रास नसेल असं नाही. त्याला समजून घ्या, चिडचिड करू नका आणि जर जोडीदाराची चिडचिड होत असेल तर याच कारण विचारून त्यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा.
2. एकमेकांशी प्रामाणिक रहा
काहीही झालं तरी एकमेकांशी प्रामाणिक रहा, आयुष्यात असा प्रसंग येउ शकतो जेव्हा आपल्याला जरा डगमळायला होईल पण तरीही एकमेकांच्या सोबत प्रामाणिक रहा, जे काही वाटत आहे ते बोलून टाका. तुमचा जोडीदार हा तुमचा पहिला मित्र असला पाहिजे.
3. एकमेकांच्या सोबत रहा
कितीही खडतर प्रसंग आला तरी एकमेकांची साथ सोडू नका, अशा खडतर प्रसंगांमध्येच दोघांमधला विश्वास वाढतो, जे काही मनात आहे ते बोला. एकमेकांवर विश्वास ठेवा. समोरच्याला साथ द्या.
4. रोज निदान 15 मिनिटं एकमेकांशी बोला
कोणत्याही नात्यात सर्वात महत्वाचा असतो तो संवाद. तुम्ही बोलल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की एकमेकांच्या आयुष्यात काय सुरू आहे त्यामुळे एकमेकांशी बोला.
5. भविष्याबद्दल बोला
एकमेकांच्या भविष्याबद्दल बोला, फ्यूचर प्लॅन डिस्कस करा, त्यांना कसं पाळायच हे ठरवा. सोबत मिळून फक्त फिरण्याचेच नाहीतर भविष्याच्या तरतुदीचेही प्लॅन करा. याने नात्यातला पाया आणखीन पक्का होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.