चुका टाळा अन् साखरपुड्यानंतर नात्यात गोडवा आणा!

पहिलाच समारंभ ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी पहिल्यांदा एकत्र येतात तो म्हणजे साखरपु़डा.
engagement
engagement esakal
Updated on
Summary

पहिलाच समारंभ ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी पहिल्यांदा एकत्र येतात तो म्हणजे साखरपु़डा.

लग्नाचे बंधन जेवढे घट्ट असते तेवढेच नाजूक लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत असते. दोन व्यक्तींमध्ये नाते (Relationships) जोडल्यानंतर दोघेही एकमेकांना समजून घेत असतात. हा केवळ वधू (bridel)आणि वर (Groom) यांच्यातील समजूतदारपणाचे दिवस नाही तर दोन्ही कुटुंबांसाठी देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे नातेसंबंध (Relationships) जुळल्यापासून ते लग्नापर्यंत अनेक विधी असतात. पहिलाच समारंभ ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी पहिल्यांदा एकत्र येतात तो म्हणजे साखरपु़डा (Engagement). साखरपु़ड्यापासून ते लग्नादरम्यानमधील कालावधी हा सुवर्णकाळ (Golden Time) मानला जातो. हेच ते दिवस असतात जेव्हा मुलगा आणि मुलगी यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी (Opportunity) मिळते. दोघेही लग्नाआधी आपापल्या नात्यात सहजतेने राहण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा सोयीच्या नात्यात ते अशी नकळत चूक करतात की लग्न तुटू शकतो. साखरपुड्यानंतर तुम्हीही लग्नाचा तो दिवस येण्याची वाट पाहत असाल तर थोडं सावध (Be careful) राहा. काही निष्काळजीपणा (Negligence) किंवा चुका आहेत ज्या टाळल्या पाहिजेत.

engagement
Relationship Tips : तुमचा पार्टनर Negative झालाय? काय करावे?

हुकूम देणे

अनेकदा असे घडते की साखरपुड्यानंतर मुले त्यांच्या होणाऱ्या पत्नीला हुकूम (Edict) द्यायला लागतात. तो विवाहित आहे आणि मुलगी त्याची पत्नी झाली आहे, असे रिअॅक्ट (React) करतात. पण लक्षात ठेवले पाहिजे की तुमचा फक्त साखरपुडा (Engagement) झालेला आहे. तुम्ही त्यांना काय करावे किंवा काय करू नये हे सांगाल तेव्हा त्यांना ते अजिबात आवडणार नाही. मुली लग्नानंतर विचार करू लागतात की, आतापासून तुम्ही त्यांच्यावर अधिकार (Rights) दाखवत असाल तर लग्नानंतर त्यांचे मन समजून घेणार नाही.

वारंवार भेटणे (Frequent visits)

साखरपुडा (Engagement) झाल्यानंतर मुलगा आणि मुलगी एकमेकांना डेट (एकमेकांना भेटणे) करू लागतात. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या ओळखी होतात, पण जास्त भेटणे त्यांच्या नात्यासाठी योग्य नाहीयेय. अतिसंवादामुळे, तुम्ही किंवा तो एकमेकांना असे काहीतरी बोलू किंवा करू शकता ज्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

engagement
Relationship Tips | प्रेमाचे 'हे' चार प्रकार, माहिती तर हवेच...

फ्लर्ट करणे (To flirt)

मुलं अनेकदा फ्लर्ट (flirt) करत असतात. साखरपुडा (Engagement) होऊनही ही सवय सुटत नाही. परंतु इतर मुलींशी फ्लर्ट करणे तुमच्या पार्टनरला वाईट वाटू शकते. त्यांच्यासमोर तुमची इमेज खराब होऊ शकते.

पार्टनरला आदर द्या (Respect your partner)

प्रत्येक मुलीला तिच्या पार्टनरकडून आदराची अपेक्षा (Expect respect) असते. साखरपुडा झाल्यावर तुम्ही दोघं बोलायला सुरुवात करता. या दरम्यान, जर तुमचे बोलणे आणि वागणे असे असेल की तुमच्या पार्टनरला वाटत असेल की तुम्ही तिचा आदर करत नाही, तर हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.