Cristiano Ronaldo Fitness : फुटबॉलचा बादशहा क्रिस्टियानो रोनाल्डो स्वतःला इतकं फिट कसं ठेवतो? काय आहे त्याचं डाएट

व्यायाम डायटसोबत त्याच्या झोपेचं गणितही आहे वेगळं
Cristiano Ronaldo Fitness
Cristiano Ronaldo Fitness esakal
Updated on

Cristiano Ronaldo Fitness :

ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो त्याच्या फिटनेस आणि खेळामुळे खूप चर्चेत असतो. तो त्याच्या मजबूत फिटनेस आणि स्नायूंच्या शरीरासाठी जगभरात ओळखला जातो. रोनाल्डो त्याच्या फिटनेसबाबत खूप ऍक्टिव्ह आहे. यासाठी तो व्यायाम आणि वर्कआउट कधीही चुकवत नाही.

मैदानात उत्तम खेळायचे असेल तर खेळाडूने फिट असणं गरजेचं आहे. यासाठीच रोनाल्डो नेहमी धडपडत असतो. खेळाची चमक कायम रहावी यासाठी योग्य डायट, योग्य व्यायामाची सांगड तो घालतो.

Cristiano Ronaldo Fitness
UEFA Champions League : मेस्सी की रोनाल्डो; सर्वाधिक हॅट्ट्रिक कोणाच्या नावावर?

रोनाल्डो स्वतःला फिट कसा ठेवतो?

रोनाल्डोच्या फिटनेसवर लोकांना विश्वास आहे. फिटनेसच्या बाबतीत तो जगभरातील क्रिकेटपटू आणि फुटबॉलपटूंमध्ये खूप लोकप्रिय आहे. 38 वर्षांचा झाल्यानंतरही तो फिटनेसच्या बाबतीत 20 ते 25 वर्षांच्या युवा खेळाडूंना मागे टाकत आहे. रोनाल्डोची फिटनेस रूटीन इतरांच्या तुलनेत थोडी वेगळी आहे.

रोनाल्डोच्या झोपेच्या बाबतीत जरा जास्तच स्ट्रिक्ट आहे. त्याच्या मते, एका वेळी 6 ते 8 तासांची झोप घेतल्याने त्याच्या प्रशिक्षणात अडथळा येतो. म्हणून, तो दिवसातून 5 तास डुलकी घेतो. आणि 6 वेळा हलके अन्न देखील खातो. रोनाल्डो शिस्त बनवतो आणि पाळतो. त्यात तो जराही तडजोड करत नाही.

Cristiano Ronaldo Fitness
Aditya Thackeray : स्वतःची मेस्सी, रोनाल्डो सोबत तुलना करत ठाकरेंनी CM शिंदेंना डिवचलं!

रोनाल्डोचे वर्कआऊट रूटीन

रोनाल्डो व्यायाम आणि वर्कआउटच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाही. तो नियमितपणे व्यायाम करतोय ज्यामध्ये 25 ते 30 मिनिटे कार्डिओ, हाय लेव्हल एक्सरसाइज आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी Weight Trainning ही करतो.

रोनाल्डो त्याचा तग धरण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि त्याचे स्नायू सक्रिय ठेवण्यासाठी क्विक लेग वर्कआउट्स आणि वॉर्म अप्स देखील करतो. एवढेच नाही तर रोनाल्डो बॉक्स जंप, ब्रॉड जंप आणि स्क्वॅट्स इत्यादी व्यायाम देखील करतो.

रोनाल्डो तंदुरुस्त राहण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही म्हणून तो सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंग अशा इतर फिजिकल ऍक्टिव्हीटीमध्ये वेळ घालवतो.

Cristiano Ronaldo Fitness
Health Care : हिवाळ्यात संत्रा खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या ‘हे’ फायदे

रोनाल्डोचे डायट कसे आहे

डायटच्या बाबतीतही रोनाल्डो खूप सक्रिय आहे. ते पोषक आणि नियमित कॅलरीजची पूर्णपणे काळजी घेतात. ते नाश्त्यात व्हाईट ऐग, एवोकॅडो टोस्ट, स्प्राऊट्स आणि फळे इत्यादी खातो. तर, दुपारच्या जेवणात, रोनाल्डोला हिरव्या भाज्या, उकडलेले अंडी, चिकन आणि मासे इत्यादी अन्न खायला आवडते. रात्रीच्या जेवणात तो खूप हलक्या गोष्टी खातात, ज्यात सॅलड, चिकन आणि काही फळांचा समावेश करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.