Curry Leaves : दररोज कढीपत्ता खाण्याचे फायदेच फायदे, काही दिवस न चुकता करा हा प्रयोग

कढीपत्ता मधुमेहाच्या रुग्णांसाठीही रामबाण उपाय ठरू शकतो
Curry Leaves
Curry Leavesesakal
Updated on

Curry Leaves :

भारतीय स्वयंपाकघरात अनेक मसाले वापरले जातात, जे जेवणाची चव तर वाढवतातच पण आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. यापैकी एक म्हणजे कढीपत्ता. कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत. जे बहुतेक लोकांना माहिती नसतील. कढीपत्त्याचे आपल्याला असलेले फायदे याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

कढीपत्ता जेवणाची चव वाढवतो, कढीपत्त्याशिवाय कोणतीही फोडणी अपूर्णच आहे. हाच कढीपत्ता कोणत्याही रोगापासून बचाव करण्यासाठी किंवा त्याची लक्षणे कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कढीपत्त्याचे असेच अनेक उपयोग आहेत ते कोणते याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Curry Leaves
Curry Leaves Benefits : आरोग्याच्या कित्येक समस्यांवर कढीपत्ता आहे गुणकारी; 'अशा' प्रकारे करा वापर


कढीपत्त्यात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यासारखी खनिजे आढळतात. ही पाने पोटासाठी रामबाण औषध मानली जातात. कढीपत्ता खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते.

दररोज 5-10 कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने लोकांची पचनक्रिया सुधारते. कढीपत्त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते. बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठीही कढीपत्त्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. कढीपत्त्यात वनस्पती संयुगे मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीराचे रोगांपासून संरक्षण करतात. (Health Tips In Marathi)

अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की कढीपत्ता अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स आणि फेनोलिक संयुगेचा खजिना आहे. हे घटक शरीराला रोग निर्माण करणाऱ्या जीवाणू आणि विषाणूंपासून वाचवतात.

Curry Leaves
Jackie Shroff Viral Video : बोले तो भिडू, जग्गू दादाची फेमस रेसिपी अंडा कढीपत्ता कशी बनवायची माहितीय?

व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी कढीपत्ता खूप फायदेशीर ठरू शकतो. मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यासाठी कढीपत्ता खूप शक्तिशाली मानला जातो. फ्री रॅडिकल्समुळे शरीराला गंभीर हानी होते.

कढीपत्त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. जीवनसत्त्वे आणि खनिजांव्यतिरिक्त, या पानांमध्ये अनेक आवश्यक तेले आढळतात. या तेलांमुळे शरीरातील जळजळ कमी होते आणि आरोग्य सुधारते.

कढीपत्त्याचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कढीपत्त्याचे सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य चांगले होते आणि रोगाचा धोका कमी होतो. कढीपत्ता फक्त हृदयासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप चमत्कारिक ठरू शकतो. (Curry Leaves)

Curry Leaves
Curry Leaves For Hair : केसांवर सतत केमिकल लावण्यापेक्षा एकदा कडिपत्त्याचा मास्क लावून बघाच!

कढीपत्ता आपल्या मज्जासंस्थेचे रक्षण करते आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून बचाव करते.विशेष म्हणजे मधुमेहाचे रुग्णही कढीपत्ता नियमित सेवन करू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, कढीपत्ता मधुमेहाच्या रुग्णांसाठीही रामबाण उपाय ठरू शकतो. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की कढीपत्ता रक्तातील साखर कमी करते आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते.(Health News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.