Baby Girl Boy Name : बाळाचं क्यूट नाव ठेवायचंय? अशी नावे जी ऐकताच चेहऱ्यावर उमटेल स्माइल

मुलांची नावे अतिशय काळजीपूर्वक ठेवली पाहिजेत. तेव्हा क्यूट आणि कौतुकास्पद नावे आज आपण जाणून घेऊयात
Baby Girl Boy Name
Baby Girl Boy Nameesakal
Updated on

Baby Name : नावे एखाद्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक रचना व्यक्त करतात. नावावरून माणसाचा स्वभाव, आकार, रंग आणि गुण ठरवले जातात. ज्योतिषशास्त्र किंवा महान तज्ञ व्यक्तीच्या नशिबाची माहिती आणि संकेत फक्त नावाने देऊ शकतात. नावाचा थेट परिणाम व्यक्तीच्या नशिबावरही होतो. म्हणूनच मुलांची नावे अतिशय काळजीपूर्वक ठेवली पाहिजेत. तेव्हा क्यूट आणि कौतुकास्पद नावे आज आपण जाणून घेऊयात.

सुंदर नावांचा प्रश्नच संपला

डोळ्यांच्या सौंदर्यावरून तुम्ही मुलींची नावे ठेवू शकता. येथे काही सुंदर आणि अद्वितीय नावे आहेत ज्यात तुम्हाला तुमच्या मुली किंवा मुलासाठी यापैकी एक नाव नक्कीच आवडेल.

कनिषा : जर तुमच्या मुलीचे नाव कुंडली पाहून 'क' अक्षरावरून पडले असेल तर तुम्ही तिचे नाव कनिशा ठेवू शकता. कनिषा म्हणजे सुंदर, आकर्षक डोळे. हे नाव तुमच्या मुलीला खूप शोभेल. तुमच्या कुटुंबातील आणि मित्रमंडळातील लोकांनाही कनिशा हे नाव आवडेल.

सुनेत्रा : हे नाव बाळाचे नावसुद्धा छान आहे. जर तुम्हीही काही अनोखे आणि थोडे वेगळे नाव शोधत असाल तर तुम्हाला सुनेत्रा हे नाव आवडेल. सुनेत्राचा अर्थ सर्वांनाच माहित आहे - सुनेत्रा म्हणजे ज्याचे डोळे आकर्षित करतात किंवा अतिशय सुंदर असतात.

सुलोच : हे नाव बाळासाठी आहे. सुलोच सुंदर डोळे असलेली व्यक्ती. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलीसाठी हे नाव देखील ठेवू शकता.

अक्षिका : तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी हे सुंदर नाव निवडू शकता. अक्षिका नावाचा अर्थ "सुंदर डोळ्यांची" असा आहे.

इंद्राक्षी : जर तुम्ही तुमच्या मुलीचे सर्वात वेगळे नाव शोधत असाल तर तुम्हाला इंद्राक्षी हे नाव नक्कीच आवडेल. ज्याचे डोळे अतिशय सुंदर आणि मोहक असतात त्याला इंद्राक्षी म्हणतात.

Baby Girl Boy Name
Baby Names for Boys-Girls: नव्या वर्षात येणाऱ्या बाळासाठी युनिक अन् ट्रेंडी नावे वाचा फक्त एका क्लिकवर

इंद्रनील : इंद्र नील नावाचा अर्थ "सुंदर डोळे असलेली व्यक्ती" असा आहे. म्हणूनच तुम्हाला हे नाव मुलासाठी चांगलं सजेशन ठरू शकतं. (Lifestyle News)

भद्राक्ष : हे नाव मुलांसाठी देखील आहे आणि ते एक अद्वितीय नाव आहे. भद्राक्ष नावाचा अर्थ "सुंदर डोळे असलेली व्यक्ती" असा आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव भद्राक्ष ठेवू शकता. हे नाव पारंपारिक नावांच्या यादीत येते जे ऐकूनही वेगळीच अनुभूती देते.

डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही. (New Baby)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.