Cycling Benefits :पालकांनो मुलांना मोबाईल नाही Cycle द्या; सायकलिंगचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल!

सायकल चालवण्यामुळे मुलांमधील आत्मविश्वास वाढतो
Cycling Benefits
Cycling Benefitsesakal
Updated on

Cycling Benefits : सायकल ही अशी एक वस्तू आहे. जी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच. लहानपणी शाळेत जाण्यासाठी तर कधी मित्राकडे आहे म्हणून मलाही हवी म्हणून हट्टाने सायकल घरात येते. थोडं मोठं झाल्यावर जून्या सायकलकडे पाहत अनेक आठवणीही जागृत होतात.

पूर्वीचे लोक सायकलवरूनच प्रवास करायचे त्यामुळे त्यांची हाडे मजबूत होती. आत्ताच्या मुलांचे मैदानी खेळ बंद झालेत. पण, त्यांनी सायकलिंग तर केलेच पाहिजे. तरच त्यांचे स्नायू, त्यांचे आरोग्य फिट राहणार आहे.

सायकल चालवणे ही एक चांगली फिजिकल ऍक्टिव्हीटी आहे.  ज्याच्या मदतीने तुम्ही आरोग्य तंदुरुस्त ठेवू शकता आणि हे फायदे सायकल जो चालवतो त्या प्रत्येकाला मिळतात. लहान मुलांसाठीही सायकल चालवणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे.(Benefits of Cycling)

Cycling Benefits
Best Cycle Brands : सायकलिंगचे अनेक फायदे आहेत?, या आहेत देशातल्या टॉप ब्रॅंडच्या सायकल!

तंत्रज्ञानाच्या वाढत्या विकासामुळे मुले मोकळ्या अगांनी खेळणं, चारचौघात मिक्स होणं विसरले आहेत. डिजिटलायझेशनचे काही फायदे असले तरी तोटेही आहेत. मुले बाहेर खेळण्याऐवजी मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉपमध्ये विविध प्रकारचे गेम्स खेळण्यास प्राधान्य देत आहेत. म्हणजे मैदानी खेळ खेळणे हळूहळू कमी होत आहे.

मैदानी खेळ खेळणं मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूप महत्वाचे आहेत. म्हणून आपण त्यांना सायकलिंग सारख्या ऍक्टिव्हीटीमध्ये रस निर्माण करावा. त्यातील एक सायकलिंग आहे.

पायांच्या स्नायूंसाठी सर्वोत्तम व्यायाम

सायकलिंग हा पायांच्या स्नायूंसाठी एक उत्कृष्ट व्यायाम आहे. जेव्हा पायांच्या स्नायूंचा व्यायाम केला जातो तेव्हा ते हृदय गती वाढवते. म्हणजे हृदयासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे. हे मुलाचे वजन देखील नियंत्रित करते, ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवत नाही. (Cycling)

Cycling Benefits
Adventure Travel Tips : Cycle सोलो ट्रिप प्लॅन करताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

ऍक्टीव्ह ठेवते

मोबाईल, लॅपटॉपचा वापर करून इनडोअर व्हर्च्युअल गेममध्ये वेळ घालवण्यामुळे मुले घरात बंदिस्त होतात. मोबाईल त्यांना आळशी बनवतात. यामुळे काही मुले लहानपणी लठ्ठ होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी आणि ऍक्टीव्ह राहण्यासाठी सायकलिंग ही एक उत्तम क्रिया आहे.

स्नायू मजबूत करतात

सध्या शाळेत जाण्यासाठी मुलं बस, गाडीचा वापर करतात. पण जर त्याची जागा सायकलने घेतली तर नक्कीच मुलांना फायदाच होणार आहे. सायकल चालवल्याने संपूर्ण शरीर मजबूत होते. त्यामुळे हळूहळू स्नायू मजबूत होतात. सायकल चालवणे ही एक संथ पण प्रभावी क्रिया आहे जी तुमच्या मुलाला दीर्घकाळासाठी मदत करेल. (Bone Health)

Cycling Benefits
Virtus Electric Cycle : गिअर सायकलच्या किंमतीत मिळतेय दमदार इलेक्ट्रिक सायकल; 'टाटा'ला देणार टक्कर!

तणाव दूर करते

सायकलिंग हे एक उत्तम स्ट्रेस रिलिफ टेक्निक आहे. सायकल चालवणे मुलांची एनर्जी रिचार्ज करण्यास मदत करते. शाळेतील दिवसभरानंतर कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल त्यांना तणावमुक्त होण्यास आणि आनंदी राहण्यास मदत करते.

आत्मविश्वास वाढतो

सायकल चालवल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. त्यांना अधिक जबाबदार वाटते. हे त्यांना त्यांच्या सभोवतालचे जग जाणून घेण्यास मदत करते आणि त्यांना त्यांच्या वातावरणाची सवय होण्यासाठी तयार करते. जेव्हा ते घराबाहेर असतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास त्यांना घाबरून किंवा अस्वस्थतेला बळी न पडता निश्चिंत राहण्यास मदत करतो. (Child Health Tips)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.