Dahi Handi Celebration: जन्माष्टमीच्या दूसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. संपुर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. पुणे, मुंबई यासह राज्यभरात इतर ठिकाणीही हा सण जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी गोविंदा पथक खुप उत्साही असतात. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाची लगबग सुरू असते. गोविंदा पथक एकापाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी 'गोविंदा आला रे आला, जरा मटकी सम्भाल ब्रीजवाला...' च्या घोषणांनी संपुर्ण परिसर दुमदुमून जातो. दहीहंडीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दहीहंडीच्या वेळी मानवी थर रचतात. अशावेळी डोक्याला, पायाला किंवा मनगटाला कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.