Dahivade Recipe : नाश्त्यासाठी दहीवडे आहे हेल्दी ऑप्शन, पण ते हॉटेलसारखे सॉफ्टच होत नाहीत? या ट्रिक्स वापरून पहा

दहीवड्याचा स्पेशल मसाला कसा बनवायचा?
Dahivade Recipe
Dahivade Recipe esakal
Updated on

Dahivade Recipe :

 दही वडा खायला खूप चविष्ट आहे. कारण तो तेलकट पदार्थ असला तरी सुद्धा पौष्टिक आहे. त्यात असलेली क्वचित खाल्ली जाणारी उडीद डाळ, अन् गोड दही आपल्या शरीरासाठी उत्तम आहे. दही वडा चवीसोबतच पोटाचीही काळजी घेतो. पण रोजचे साऊथ इंडियन नाश्ते बनवतो तसे दहीवडे क्वचित बनवले जातात.

काही गृहिणींची तक्रार असते की, दहीवडे तळून काढले तर ते कुरकुरीत होतात. हॉटेलमध्ये असतात तसे मऊ नसतात. हॉटेलमध्ये दह्यात बुडवलेले दहीवडे तुम्ही पाहिले असतील. घरी ही ट्रिक वापरली तरी वडे सॉफ्ट होत नाहीत. त्यासाठी हॉटेलवाले काय ट्रिक वापरतात हे पाहुयात. (Dahivade recipe in marathi)

Dahivade Recipe
Anti-Aging Food: महिला अन् पुरूषांसाठी 'हे' अँटी- एजिंग पदार्थ फायदेशीर

उडीद वड्यासाठी साहीत्य

उडीद दाळ – अर्धाकिलो

मूग डाळ – पाव किलो

दही – अर्धाकिलो, वेलची पूड, साखर

हिरवी चटणी

चिंचेची चटणी

डाळिंबाचे दाणे - १ वाटी

शेव किंवा बुंदी

दहीवडे स्पेशल मसला  

कृती -

सर्वप्रथम तुम्हाला उडीद डाळ आणि मूग डाळ स्वच्छ पाण्याने नीट धुवावी लागेल. यानंतर ही डाळ साधारण ३ तास ​​पाण्यात भिजत ठेवावी. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर ही डाळ कोमट पाण्यात भिजत ठेवा. नंतर उडीद डाळ पाण्यातून काढून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवा. जेणेकरून डाळीत राहिलेली पावडर पूर्णपणे निघून जाईल.

यानंतर मिक्सरच्या मदतीने बारीक करून पेस्ट बनवा. आता या तयार पेस्टमध्ये हिंग पूड घाला आणि चांगले मिसळा. जर तुम्हाला तुमचा दहीवडा खूप स्पॉन्जी आणि मऊ बनवायचा असेल तर ही तयार पेस्ट हलकी होईपर्यंत फेटत रहा. (Food)

Dahivade Recipe
Soyabean Cutlet Recipe : नाश्त्याला बनवा टेस्टी आणि हेल्दी सोयाबीन कटलेट्स, एकदम सोपी आहे रेसिपी

यानंतर या पेस्टमध्ये भाजलेले जिरे, हिरवी मिरची, आले, धने, काजू, बेदाणे आणि चवीनुसार मीठ मिसळा. आता कढईत तेल टाकून मंद आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर तयार डाळीची पेस्ट पॅनमध्ये टाकून गोळे बनवा.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तांदळाच्या चमच्याने किंवा गोल चमच्याची मदत घेऊ शकता आणि जर तुम्हाला ते हाताने बनवण्यास सोयीस्कर वाटत असेल, तर प्रथम तुमच्या हाताला थोडे तेल लावा, जेणेकरून तुम्हाला चांगले गोळे बनवता येतील.

Dahivade Recipe
Rose Lassi Recipe : घरच्या घरी बनवा रोझ लस्सी, कडक उन्हाळ्यात मिळेल थंडावा! सोपी आहे रेसिपी

त्यानंतर हे वडे हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. नंतर त्यांना बाहेर काढा आणि गरम मिठाच्या पाण्यात टाका आणि थोडा वेळ तसेच सोडा. असे केल्याने भल्यांचे अतिरिक्त तेल निघून ते पूर्णपणे मऊ होतील. वड्यातील पाणी पिळून काही वेळ थंड होण्यासाठी ठेवा.

नंतर एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्यावर गोड दही, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, डाळिंबाचे दाणे,बारीक शेव किंवा बुंदी घाला. त्यावर चाट मसाला, गरम मसाला आणि थोडे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घाला.

Dahivade Recipe
Carrot Chia Pudding Recipe : गोडही अन् हेल्दीही! आहारात करा या पुडिंगचा समावेश, कोलेस्ट्रॉलसोबतच बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम

हिरवी चटणीसाठी साहीत्य

कोथंबीर,पुदीना, मिरची मीठ, फुटाणे डाळ एक चमचा, या सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट करून घ्या. (Recipe)

दहीवड्यांचा स्पेशल मसाला

जिरे, काळे मिरे, ओवा आणि लाल मिरच्या एकत्र भाजून घ्या. भाजून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घाला यामध्ये काळे मीठ, पांढरे मीठ, आमचूर पावडर घाला.

Dahivade Recipe
Vegetable Cutlets Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा व्हेजिटेबल कटलेट, जाणून घ्या रेसिपी

चिंचेची चटणी –

चिंच एक वाटी, समप्रमाणात खजूर, गूळ, तिखट मीठ,

कृती – खजूर आणि चिंच वेगवेगळे गरम पाण्यात भिजत घाला. अर्धातासाने मिक्सरमधून हे दोन्ही काढून घ्या. त्याची बारीक पेस्ट करा. ती गाळून घ्या. त्यानंतर मोठ्या भांड्यात चिंच, मीठ, लाल तिखट आणि गूळ घालून शिजवून घ्या. गूळ पूर्ण वितळेपर्यंत हे मिश्रण एकजीव करून घ्या. थंड झाले की बरणीत भरून ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.