Daily Salt Intake : डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा, ‘एक चुटकी मीठ’ तुम्हाला १०० टक्के आजारी पाडणार!
Health Precaution : जास्त मीठ लोकांसाठी घातक ठरू शकते कारण यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवतात. जेवणात मीठ किती आवश्यक आहे आणि सोडियमच्या अतिसेवनामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात हेदेखील डब्ल्यूएचओने सांगितले आहे. जर तुम्ही तुमच्या आहारात मीठाचे प्रमाण जास्त असेल तर हे अनेक आजारांचे कारण असू शकते.
डब्ल्यूएचओच्या आरोग्य आणि विकासासाठी पोषण विभागाचे संचालक डॉ.फ्रान्सिस्को ब्रांका यांनी आपण दिवसभरात किती मीठ खावे याबद्दल माहिती दिली आहे.
जास्त मीठ जीवघेणा ठरू शकते जागतिक आरोग्य संघटनेने असा दावा केला आहे की, मीठ हे जगभरात मोठ्या संख्येने लोकांच्या मृत्यूचे कारण आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालात असे म्हटले आहे की, जास्त मीठामुळे अनेक आजार होतात. २०२५ पर्यंत लोकांच्या आहारातील मीठ ३० टक्क्यांनी कमी करण्याचे डब्ल्यूएचओचे उद्दिष्ट आहे.
ब्राझील, चिली, लिथुआनिया, मलेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, स्पेन आणि उरुग्वे या नऊ देशांनी मीठ कमी करण्यासाठी विशिष्ट नियम निश्चित केले आहेत. वेळीच आवश्यक ती पावले न उचलल्यास येत्या सात वर्षांत सुमारे लाखो लोकांना त्यासंबंधित आजारांमुळे आपला जीव गमवावा लागू शकतो, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.
मीठामध्ये सोडियम असते जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयरोग, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढू शकतो. याशिवाय जगभरातील अनेक संशोधनात असे समोर आले आहे की, जास्त काळ जास्त प्रमाणात सोडियम घेतल्यास लठ्ठपणा, पोटाचा कर्करोग आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका वाढतो.
डब्ल्यूएचओने एका अहवालात म्हटले आहे की जास्त मीठ लोकांसाठी घातक ठरू शकते कारण यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवतात. जेवणात मीठ किती आवश्यक आहे आणि सोडियमच्या अतिसेवनामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात हेदेखील डब्ल्यूएचओने सांगितले आहे.
हे आजार वाढतात
मीठामध्ये सोडियम असते, जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयरोग, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढू शकतो. याशिवाय जगभरातील अनेक संशोधनात असे समोर आले आहे की, जास्त काळ जास्त प्रमाणात सोडियम घेतल्यास लठ्ठपणा, पोटाचा कर्करोग आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका वाढतो.
आपल्या शरीराला मिठाची गरज का असते
मिठात सोडियम आणि पोटॅशियम दोन्ही असतात. मानवी शरीरात पाण्याची योग्य पातळी निर्माण करण्यापासून, सोडियम सर्व अवयवांना ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये पोहोचविण्यात मदत करते. यामुळे आपली रक्तवहिन्यासंबंधी आणि मज्जासंस्था योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम आहे. लोक मीठ दुप्पट प्रमाणात खातात. भारतीयांमध्ये मिठाचा वापर वाढत आहे. याचे कारण आपले अन्न आहे.
दिवसाला किती मीठ खावे
आजकाल आपण ज्या प्रकारचे अन्न खातो. त्यात मीठ जास्त असते. कोणत्याही व्यक्तीने एका दिवसात पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये, परंतु जगभरातील लोक दररोज 10.8 ग्रॅम मीठ वापरतात, जे काही काळानंतर शरीरात घातक परिणाम देऊ लागतात आणि हृदयविकाराचा झटका, किडनी, स्ट्रोक, उच्च रक्तदाबासारखे आजार होतात.
मीठ हे अनेक रोगांचे कारण आहे. अल्पावधीत मिठाच्या अतिवापराने हृदयाचे ठोके जलद होणे. जास्त तहान लागणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळासाठी सोडियमचा जास्त वापर केल्यास उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो, उच्च रक्तदाब, ज्यामुळे पुढे स्ट्रोक आणि इतर गंभीर हृदयविकार होऊ शकतात, असे दिल्लीच्या इंटरनल मेडिसिन विभागाचे संचालक डॉ. रोमेल टिकू यांनी स्पष्ट केले.
सोडियमचे प्रमाण कशात असतं जास्त
चिप्स
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही घराबाहेर जे काही पदार्थ खाता, त्यात मीठाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असते. तुम्हाला एका दिवसात खाण्यासाठी आवश्यक असलेले अर्धे मीठ 150 ग्रॅम चिप्सच्या पॅकेटमध्ये मिळते. आरोग्य अहवालानुसार, बटाटा चिप्सच्या एका सर्व्हिंगमध्ये 170 मिलीग्राम सोडियम असते.
रेडी टु इट
आज काल अनेक जण रेडी टू इट फूडवर अवलंबून असते. पण डॉ. ब्रँका यांच्या मते या पदार्थांमध्ये 80 टक्के मीठ आढळते. त्यामुळे असे पदार्थ खाणं टाळा.
प्रोसेस केलेलं अन्न
आपल्याला सर्वांना महित आहे की मीठाचा वापर केल्याने अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात. आपण सर्वजण प्रक्रिया केलेले अन्न जितके टाळू तितके चांगले. यामध्ये मीठाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांना किमान खरेदी करण्याचा प्रयत्न करा.
सैंधव मीठ खाण्याचा ट्रेंड वाढत आहे
आजकाल सामान्य आयोडीनयुक्त मिठाऐवजी खडे मीठ वापरण्याचा ट्रेंड लोकांमध्ये वाढू लागला आहे. पूर्वी भारतात लोक फक्त उपवासातच रॉक सॉल्ट खात असत. पण आता रोजच्या जेवणातही त्याचा वापर केला जात आहे. यावर डॉ. रोमिल म्हणाले, "रॉक मिठात सामान्य मिठापेक्षा जास्त खनिजे असतात, कारण ते तयार केले जाते.
रासायनिक प्रक्रिया वापरली जात नाही. यामध्ये मॅग्नेशियम, सल्फर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि झिंक सारखे घटक आढळतात, जे हाडे, स्नायू, पचन आणि रक्तदाब यांच्याशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवतात. परंतु ते सामान्य मीठाने बदलणे फार कठीण आहे आणि त्यात सोडियम आढळत नाही असे नाही.
लोकांनी या सवयी बदलाव्यात
जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, लोकांनी आपल्या आहारात साखरेचा कमी वापर करावा याची जाणीव करून देणे सर्वात महत्त्वाचे आहे. अधिक मीठ खाण्याची सवय बदलण्यासाठी मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रम राबवले पाहिजेत.
रुग्णालये, शाळा, कार्यालये यासारख्या सार्वजनिक संस्थांनी उच्च सोडियम उत्पादनांच्या विक्रीवर मर्यादा घालण्यासाठी आणि कमी सोडियम उत्पादनांची उपलब्धता वाढवण्यासाठी धोरणे स्वीकारली पाहिजेत.
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, पॅकेज्ड फूडमध्ये मीठाचे प्रमाण कमी करण्याबरोबरच पुरावे नमूद करावेत जेणेकरुन खरेदीदाराला वापरलेल्या साखरेचे प्रमाण सहज समजू शकेल.
लोकांना कमी सोडियमयुक्त पदार्थ निवडणे सोपे होईल आणि त्यामुळे जास्त गोड खाणे टाळावे लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.