Eye Care: उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ- आग होतेय? 4 उपाय, डोळ्यांना वाटेल थंड

तुमच्याही डोळ्यांची सतत जळजळ होतेय का, उन्हाचा पारा वाढत असताना डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स..
eye
eyesakal
Updated on

उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागांमध्ये कडक उष्णतेचा कहर सुरूच आहे. उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ऊन आणि उष्मा यामुळे आरोग्य आणि त्वचेचेच नव्हे तर डोळ्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. उन्हाळ्यात डोळ्यांना खाज येणे, लाल होणे किंवा सतत पाणी येणे हे सामान्य मानले जाते.

गरम हवेमुळे त्यातील धूळ आणि घाण डोळ्यांना आणि त्वचेला वेदना किंवा इतर नुकसान करतात. हवामानामुळे तुमचे डोळे वाचवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. जाणून घ्या डोळ्यांची काळजी घेण्याच्या या टिप्स...

eye
Raw Milk: कच्च्या दुधाचे सुंदर त्वचेसाठी चमत्कारी फायदे; वाचून व्हाल थक्क

गुलाब पाणी

उन्हाळ्यात डोळ्यांना थंड ठेवणं गरजेचं आहे आणि यासाठी तुम्ही गुलाब पाण्याची मदत घेऊ शकता. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले गुलाबपाणी थंड करणारे घटक मानले जाते. उन्हाळ्यात त्वचा आणि डोळे थंड ठेवण्यासाठी तुम्ही दररोज वॉटर स्प्रे वापरू शकता. दिवसातून दोन ते तीन वेळा डोळे आणि त्वचेवर गुलाबपाणी स्प्रे करा.

बटाटा गुणकारी आहे

डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतील तर ती बटाट्याने दूर करू शकता. याशिवाय उष्णतेमुळे किंवा इतर कारणांमुळे डोळ्यांवर सूज येत असेल तर ती बटाट्याने कमी करता येते. बटाटा सोलून त्याचे काप करून डोळ्यांवर ठेवा. ही रेसिपी दिवसातून एकदा नक्की करून पहा.

eye
Homemade Drinks: ‘हे’ 4 हेल्दी ड्रिंक्स तुम्हाला पोटदुखीपासून त्वरित आराम देतील, वाचा अधिक!

काकडी

उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठीही काकडीचा वापर करता येतो. काकडीत जास्त पाणी असते, त्यामुळे ते त्वचेतील ओलावा टिकवून ठेवू शकते. डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप डोळ्यांवर ठेवू शकता. ही पद्धत अवलंबणे सोपे आहे आणि त्यामुळे लगेच फरक पडतो.

थंड पाणी

तसे, आपण थंड पाण्याने डोळे थंड करू शकता. थोडं थंड पाणी घ्या आणि त्यानं डोळे स्वच्छ करा. हे दिवसातून किमान दोनदा करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()