फुलांचा राजा म्हणून ओळख असलेल्या गुलाबाची लागवड संपूर्ण भारतात केली जाते. शोभेसाठी वापरासोबत, या गुलाबांपासून परफ्यूम, सुगंधी तेल आणि सौंदर्य उत्पादने तयार केली जातात. गुलाबाच्या जगभरात कित्येक प्रजाती आढळून येतात. यांपैकी एक खास प्रजाती म्हणजे, दमास्क गुलाब. या गुलाबाची खासियत म्हणजे, त्याची किंमत!
दमास्क गुलाबाची किंमत सामान्य गुलाबापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. असं म्हटलं जातं की दमास्क गुलाबाचं मूळ ठिकाण सीरिया आहे, परंतु आता अनेक देशांमध्ये त्याची लागवड केली जाते. हिमाचल प्रदेशात शेतकऱ्यांना त्याची लागवड करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. दमास्क गुलाबापासून परफ्यूम आणि अत्तर बनवले जातात. याशिवाय पान मसाला, तेल आणि गुलाबजल बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो.
सध्या गुणवत्तेमुळे भारतातही दमास्क गुलाबाची मागणी वाढत आहे. या गुलाबापासून तयार करण्यात आलेलं तेल 10 ते 12 लाख रुपये किलो या दराने विकले जाते. भारतातील शेतकऱ्यांनी दमास्क गुलाबाची लागवड केल्यास त्यांचे नशीब बदलू शकते. विशेष म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी (IHBT), पालमपूर, हिमाचल प्रदेश सातत्याने दमास्क गुलाबावर संशोधन करत आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना त्याच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळू शकेल.
यामुळे आहे महाग
बाजारात दमास्क गुलाबाची किंमत मागणीनुसार वर-खाली होत असते. मात्र त्याच्या तेलाचा दर नेहमीच 10 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान असतो. त्याचे तेल इतके महाग विकले जाते, कारण एक किलो तेल काढण्यासाठी साडेतीन टन दमास्क गुलाबांची गरज असते. असं असताना, दुसरीकडे देशात दमास्क गुलाबाचे उत्पादन फारच कमी आहे. त्यामुळेच त्याचे तेल इतके महाग विकले जाते. हे तेल काढताना, गुलाबपाणी देखील बाहेर येते, जे सामान्य गुलाबाच्या पाण्यापेक्षा खूपच उपयुक्त असते.
फुलांच्या तेलामध्ये 100 ते 150 संयुगे
आयएचबीटीचे अभियंता मोहित शर्मा सांगतात की, फुलांपासून काढलेले तेल किंवा त्याच्या रसापासून बनवलेले परफ्यूम काचेच्या बाटलीत ठेवले जात नाही. ते फक्त अॅल्युमिनियमच्या बाटलीतच ठेवावे लागते. मोहित शर्मा यांच्या मते, फ्लॉवर ऑइलमध्ये 100 ते 150 कंपाऊंड्स आढळतात. यापैकी फक्त 15-16 संयुगे अशी आहेत, जी तेलाच्या स्वरूपात आहेत. फुलांचे तेल काचेच्या बाटलीत ठेवल्यास त्यावर सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे तेलातील ही संयुगे खराब होऊन तेल निरुपयोगी ठरतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.