पूर्वा कौशिकलहानपणापासून मला नृत्य करायला आवडायचे. त्यानुसार मी भरतनाट्यमचा डिप्लोमाही पूर्ण केला; परंतु माझे ‘अरंगेत्रम’ मात्र राहून गेले आहे. ही कला माझा छंद आहे. मी तणावात असते किंवा माझ्याकडे वेळ असतो तेव्हा मी नृत्य करून माझा छंद जोपासत असते..पाचवीत असताना माझा भरतनाट्यमचा डिप्लोमा पूर्ण झाला. त्यानंतर माझ्या गुरू दुसऱ्या गावी वास्तव्यास गेल्याने पुढचे शिक्षण थांबले. मात्र, मी नृत्य करणे सोडले नाही. माझा रियाज आजही अपूर्ण असला, तरी छंदाच्या माध्यमातून तो करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यासाठी कामाच्या व्यस्ततेमधून मी वेळ काढतेच. माझे अपूर्ण असलेले ‘अरंगेत्रम’चे स्वप्न पूर्ण करणार आहे. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी मी पुन्हा क्लास लावला होता. मात्र, वेळेअभावी त्याकडे लक्ष देणे होत नाही. माझ्या आयुष्यात नृत्य हा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी वेळ मिळो न मिळो, मी नृत्याचा छंद कायम जोपासत राहणार आहे..ती बडबडी, तर मी अबोल!.या छंदातून मला मानसिक समाधान मिळते. शिवाय व्यायाम होतो, तणाव कमी होण्यासाठी मदत होते. सहसा भरतनाट्यम नृत्यप्रकार खूप कमी जण शिकतात. त्याकडे अनेकांचा कल नसतो. कारण त्यामध्ये पारंपरिकता अगदी काटेकोरपणे जपली जाते. त्यामुळेच हा नृत्यप्रकार मला आवडतो. भविष्यात या नृत्यप्रकाराचा प्रसार करण्याचा माझा मानस आहे. त्यामध्ये आणखी काही करता आले तशी संधी मिळाली तर निश्चितच त्यात पुढे जाईन..माझ्या आयुष्यात नृत्य हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अरंगेत्रम हे मी कधीपर्यंत पूर्ण करणार ते ठरविले आहे. त्यानंतरही मी भरतनाट्यमचा प्रसार करण्याचा माझा मानस आहे. अनेक जण कथक नृत्य प्रकाराचे शिक्षण घेतात, सहसा भरतनाट्यम या नृत्यप्रकाराकडे खूप कमी जण वळतात. या नृत्यप्रकारात पारंपरिकता सर्वांत जास्त जपली जात आहे. ही गोष्ट मला आवडते, त्यामुळे माझ्या नृत्याच्या छंदाला मला पुढे नेत त्याचा प्रसार करावयाचा आहे..मी घरात रिकाम्या वेळेत नृत्य करते. या छंदातून माझे मन शांत होते. मी थोडी शीघ्रकोपी असल्याने मला शांत होण्यासाठी नृत्य हा चांगला पर्याय आहे. शांत राहण्यासाठी मेडिटेशन करू शकत नाही, त्यामुळे नृत्य हा प्रकार चांगला आहे. मला अधिक प्रमाणात तणाव असतो, तेव्हा मी नृत्य करून तो ताण कमी करण्याची प्रयत्न करते. मी दोन मिनिटेसुद्धा शांत बसू शकत नाही. तेच मी नृत्य केल्यावर माझा चंचलपणाही कमी होतो. सेटवरसुद्धा छंद जपण्याचा प्रयत्न करीत असते. दोन सीनच्यामध्ये किंवा ब्रेकमध्येही मला नृत्य करायला आवडते. या वेळेत आम्ही रील्सच्या माध्यमातून नृत्य करण्याचा प्रयत्न करते. जे अपूर्ण राहिलेले आहे, ते पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. भविष्यात मला माझ्या व्यस्ततेमधून वेळ मिळाल्यास नक्कीच पहिल्यांदा मी ‘अरंगेत्रम’ पूर्ण करणार आहे. छंदातून मला सतत पुढे जात राहण्याची प्रेरणाही मिळते..आत्मविश्वासाने व्यवसाय करा (व्हिडिओ).डूडलिंगचीही आवडडूडलिंग करायला मला खूप आवडते. लॉकडाउनमध्ये मी डूडलिंगची कला वृद्धिंगत केली. या काळात कशा प्रकारे डूडलिंग केले जाते या विषयी माहिती घेतली. रेखाचित्रांचा हा खेळ मला भावला आणि मला डूडल करण्याचा सूर गवसला. एक लघुपट पाहून मला डूडल करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातही मी पुढे जाऊ इच्छित आहे. मी घरी निवांत असते किंवा शूटिंग संपवून घरी येते तेव्हा डूडलिंगसाठी कागदावर काहीना काही उतरवतेच. त्यातूनही माझा ताण कमी होतो.(शब्दांकन : तनिष्का डोंगरे).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.