Dark Chocolate vs Milk Chocolate : डार्क की मिल्क... आरोग्यासाठी कोणतं चॉकलेट आहे फायद्याचं? जाणून घ्या

डार्क की मिल्क... आरोग्यासाठी कोणतं चॉकलेट आहे फायद्याचं?
Dark Chocolate vs Milk Chocolate : डार्क की मिल्क... आरोग्यासाठी कोणतं चॉकलेट आहे फायद्याचं? जाणून घ्या
Updated on

अनेकांना चॉकलेट खाण्याची आवड असते. आज बाजारात विविध प्रकारची चॉकलेट्स उपलब्ध आहेत, जी लोक मोठ्या उत्साहाने खातात. एवढेच नाही तर प्रत्येकाला त्याच्या चवीनुसार विशिष्ट प्रकारचे चॉकलेट आवडते. मुख्यतः डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट. आम्ही तुम्हाला सांगतो, या दोन्ही प्रकारच्या चॉकलेट्सची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. अशा परिस्थितीत, आरोग्याच्या दृष्टीने कोणते चॉकलेट तुमच्यासाठी चांगले आहे, हे जाणून घेऊया.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण सुमारे 80 टक्के असते, जे मिल्‍क चॉकलेटपेक्षा जास्त असते. तुम्हाला त्याची चव थोडी कडवट वाटू शकते. त्यात झिंकचे प्रमाण 89, लोह 67, मॅग्नेशियम 58 टक्के आणि फायबरचे प्रमाण 11 ग्रॅम आहे. याव्यतिरिक्त, त्यात फॉस्फरस, पोटॅशियम आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असते.

Dark Chocolate vs Milk Chocolate : डार्क की मिल्क... आरोग्यासाठी कोणतं चॉकलेट आहे फायद्याचं? जाणून घ्या
Superfood for Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी या पदार्थांचा करावा आहारात समावेश, रक्तातील साखरेची समस्या होईल दूर

मिल्क चॉकलेट

मिल्क चॉकलेटमध्ये दूध आणि साखर जास्त असते. 100 ग्रॅम बारमध्ये तुम्हाला 535 कॅलरीज मिळतात, तर डार्क चॉकलेटमध्ये ही संख्या सुमारे 600 असते. तुम्हाला मिल्क चॉकलेटमध्ये डार्क चॉकलेटच्या तुलनेत कमी पोषक तत्व मिळतात. याशिवाय त्यात साखरेचे प्रमाणही जास्त असते. अशा स्थितीत याचे जास्त प्रमाणात सेवन करणे तुमच्यासाठी चांगले नाही.

कोणते चॉकलेट आरोग्यासाठी चांगले आहे?

आम्ही तुम्हाला सांगतो की आरोग्यासाठी डार्क चॉकलेट उत्तम आहे. चयापचय वाढवणे असो वा हृदयाचे आरोग्य किंवा रक्तदाब नियंत्रणात ठेवणे असो, डार्क चॉकलेट तुम्हाला प्रत्येक स्तरावर अनेक फायदे देते. तुम्ही दोन्ही चॉकलेट मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.