Beauty Tips : डोळ्यांखाली काळी वर्तुळं वाढत्या वयाचे लक्षण; चिंता नको करा हे उपाय

बदललेली जीवनशैली आणि मोबाईलचा अतिवापरामुळे कमी वयात वयस्कर दिसण्याची वेळ
Beauty Tips
Beauty Tips esakal
Updated on

Beauty Tips For Dark Circles : आजकाल अगदी १५ वर्षाच्या मुलांपासून ते चाळीशीच्या वयाच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांच डोळ्यांखाली काळी वर्तुळं (dark circles) येण्याचा त्रास जाणवत आहे. आपले वय जसे वाढत जाते त्याप्रमाणे त्वचेतील (Skin) तजेलपणा कमी होण्यास सुरूवात होते. यामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष, पोषक आहाराची कमतरता यामुळे देखील चेह-याचा तजेलपणा कमी होतो.

Beauty Tips
Beauty tips : काळवंडलेल्या पायांचे सौंदर्य परत कसे आणाल ?

बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि मोबाईलचा अतिवापर यामुळे कमी वयात वयस्कर दिसण्याची वेळ आज प्रत्येकावर आली आहे. या सगळ्यांचा परिणाम तुमच्या चेह-यावर दिसायला लागतो.

Beauty Tips
Beauty Tips : नखावर लवकर नेलपॉलिश वाळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या

चेह-यावर सुरकुत्या, चेहरा कोरडा पडणे आणि चेह-यावर काळे डाग पडण्यास सुरूवात होते. त्यामुळेच आज जाणून घेऊयात डोळ्यांखाली काळी वर्तुळं का येतात? आणि त्यावर काय उपाय करावेत.

Beauty Tips
Beauty Tips : नखावर लवकर नेलपॉलिश वाळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या

डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्याची कारणे

टीव्ही, मोबाइल जास्त बघणं ही सवय डोळ्याभोवती काळी वर्तुळं येण्यास कारणीभूत ठरते. रात्री अपरात्री मोबाईल वापरणे, त्यासाठी चष्मा न वापरणे यानेही काळी वर्तुळं दाट होतात.पुरेशी झोप न होणे. ताण तणाव, थकवा यामुळे काळी वर्तुळं येतात. शास्त्रीयदृष्ट्या मनुष्याला साधारण ७ तासाची झोप घेण गरजेचे आहे. तसे होत नसेल तर तूमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

Beauty Tips
Beauty Tips : तुम्हाला सतत लिपस्टिक लावयला आवडते? सावधान, होऊ शकतात गंभीर परिणाम

अनुवांशिकतेमुळे काळी वर्तुळं आली असतील तर ती पूर्णत: काढून टाकणे शक्य नसते. त्यामुळेच ते काही उपचारांनी थोडे फिकट करता येऊ शकतात.सौंदर्य प्रसाधने वरदान आहेत तसेच ती शापही ठरत आहेत. डोळ्यांसाठी केला जाणारा हेवी मेकअप डोळे काळे पडण्यास कारणीभूत ठरत आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्ये केमिकलचा होणारा अतिवापर तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य अधिकच बिघडवण्याचे काम करत आहेत.

Beauty Tips
Beauty Tips: त्वचेच्या सर्व समस्यांसाठी हा एकच रामबाण उपाय

केवळ बाह्य गोष्टीच नव्हे तर आपण घेत असलेल्या आहाराचाही परिणाम आपल्या सौंदर्यावर होत असतो. आहारातील मिठाचं सेवन अधिक केल्यानेही काळी वर्तुळं येतात.शरीरात सकस अन्न आणि पाण्याची योग्य मात्रा जाणे आवश्यक आहे. शरीरात पाणी कमी पडल्यास डिहायड्रेशन होऊन अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळेही डोळ्याभोवती काळी वर्तुळं निर्माण होतात.

Beauty Tips
Beauty Tips : ऐश्वर्या रॉयसारखे ग्लॅमरस दिसायचंय ? जाणून घ्या तीचे ब्युटी सिक्रेट

धूम्रपानाची सवय असल्यास कोलॅजन निर्मितीस अडथळा येतो, त्यामुळे त्वचा काळी पडते, खराब होते. त्वचेची लवचिकता कमी होते. त्वचेखालील रक्तप्रवाह बिघडतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडतात.

Beauty Tips
Beauty Tips: महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा वापरा दुधावरची साय, मिळवा झटपट ग्लो

काळी वर्तुळं घालवण्यासाठी उपाय

बटाट्याचा रस (Potato juice)

डोळ्याभोवती काळी वर्तुळे जाण्यासाठी बटाट्याचा रस लावला जातो. बटाट्याच्या चकत्या डोळ्याभोवती ठेवल्यानेही फरक पडतो

लिंबाचा रस (lemon juice)

लिंबाचा रस आणि दोन थेंब खोबरेल तेल एकत्र घेऊन डागांवर लावावे.१० मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा.

Beauty Tips
Beauty Tips : शेहनाजच्या चेहऱ्यावर कधीच येत नाहीत पिंपल्स ; वाचा तिचे ब्यूटी टिप्स

कोल्ड टी बॅग (cold Tea Bag)

वापरलेली कोल्ड टी बॅग किंवा चहाचा चोथा सुती कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावा. अर्ध्यातासाने ते डोळ्यांवर ठेवावे. या उपयानेही फरक जाणवतो. हे उपाय करत असतानाच आपल्या जीवनशैलीत थोडाफार बदल करून पुन्हा तरूण दिसू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.