Dark Tea For Diabetes : तात्या वाईच च्या घ्या की, सुरेशची हाक ऐकून तात्या थांबलं, उभ्याउभ्याच बोललं अन् चालू लागलं, पर तात्यांनी च्या काय घेतला नाही. आवो घेतील तरी कसं, तात्यांना ते साखर हाय न्हवं’, १९९० च्या दशकात केवळ पिक्चरमध्ये असलेला हा आजार आज गल्लोगल्ली पोहोचला आहे याचं हे उदाहरण.
देशात मधुमेहाचे रूग्ण घरोघरी आढळतात. याचे कारण म्हणजे साखरेचे वाढलेले प्रमाण. पुर्वीच्या काळातील लोक जे असेल ते खात होते. पण आता लोक भुकेपेक्षा जिभेसाठी खातात आणि मग हे असे आजार त्यांना येऊन चिकटतात.
काही लोकांचा दिवस चहाशिवाय सुरू होत नाही. तुम्हाला जगभरात असे चहाप्रेमी सापडतील. पण मधुमेहाच्या रूग्णांना मात्र शेवटपर्यंत चहा पिण्याची इच्छा पूर्ण करता येत नाही. जगात चहाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. जे पिण्याने अनेक फायदे मिळतात. यामध्ये डार्क चहाचाही समावेश होतो.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की डार्क टी रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करू शकते. नुकत्याच झालेल्या एका नव्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे अॅडलेड विद्यापीठ आणि चीनच्या साउथ ईस्ट युनिव्हर्सिटीने हे संशोधन केले आहे.
डार्क चहाबद्दल जाणून घ्या. गडद चहा हा एक प्रकारचा ऑक्सिडाइज्ड चहा आहे. हा चहा सूक्ष्मजीव किण्वनातून जातो. त्याची पाने ऑक्सिडाइज्ड असल्याने त्याचा रंगही बदलतो. डार्क चहा हा काळ्या चहापेक्षा खूप वेगळा आहे.
संशोधकांना असे आढळून आले की, जे कधीच चहा घेत नाहीत. त्यांच्या तुलनेत, चहा घेणाऱ्या लोकांना मधुमेहा होण्याचा धोका 53 टक्के कमी असतो. या लोकांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका 47 टक्के कमी होता. या संशोधनात, वय, लिंग आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) सारख्या मधुमेहाच्या जोखीम घटकांचा विचार करण्यात आला. (Health Tips)
कसा बनतो डार्क टी
डार्क चहा हा पूर्णपणे ऑक्सिडाइज्ड चहाचा एक प्रकार असून हा चहा माइक्रोबियल फर्मेशनने तयार होतो. चहाच्या पाने आंबवल्याने रंग पानांचा रंग बदलतो. या पानांपासून बनलेल्या चहाला 'डार्क' चहा म्हणतात. ब्लॅक चहा हा खूप काळा आणि ऑक्सिडाइज्ड असतो, ग्री चहा अनऑक्सिडाइज्ड असतो, यलो चहा किंचित फर्मेटेड असतो आणि डार्क ब्लॅक चहा फर्मेशनच्या नंतर तयार होतो.
तो कसा फायदेशीर आहे?
साहित्यानुसार, डार्क टी दोन प्रकारे मधुमेहाचा धोका कमी करते. सर्वप्रथम ते शरीरातील इंसुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते. ज्यामुळे तुमचे शरीर रक्तातील साखरेचे नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. दुसरे कारण असे की, ते तुमच्या लघवीमध्ये ग्लुकोजचे उत्सर्जन वाढवण्यास हातभार लावते. याचा अर्थ रक्तातील साखर प्रत्यक्षात कमी करणे आवश्यक आहे.
फक्त ही एक गोष्ट पाळा
हा चहा तुमच्या रक्तातील साखर कमी करू शकेल. पण इतकंच करा की, डार्क टीमध्ये कोणत्याही प्रकारचे गोड पदार्थ वापरू नका. साखर घातल्यास शरीराला त्याचा काहीच फायदा होत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.