Red Flag in Relationship: सध्या डेटिंग हे एकंदरीतच गुंतागुंतीच झालंय. नातेवाईकांच्या ओळखीतून आलेलं स्थळ, विवाहविषयक वेबसाईटवर प्रोफाईल चाळून कंटाळलेली तरुण पिढी शेवटी डेटिंग ॲप्सकडे वळते. फोटो पाहून, बायो वाचून राईट स्वाईप केलेली व्यक्ती खऱ्या आयुष्यातही कशी आहे? हे समजायला काही वेळ द्यावा लागतो. परंतु, या कालावधीतही काही संकेत असतात. ज्यातून तुम्हाला समोरचा व्यक्ती कसा आहे? याचा अंदाज बांधता येतो. यातले रेड फ्लॅग्स काय? डेटिंग अॅपवर भेटणाऱ्या व्यक्तींचे तीन प्रकार कोणते? हे आधी समजून घेतले पाहिजे.