कोरोना साथीमुळे गेली २ वर्ष लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे बहुतांश लोकं घरात आहेत. आताही लॉकडाऊनचे(Lockdown) निर्बंध शिथिल झाले तरी अनेक लोकं घरूनच काम करत आहेत. साथरोगाचा नातेसंबंधांवरही (Relationship) परिणाम झाला. नात्यात चढ उतार आले. त्यामुळे इंटरनेटचा आधार घेत अनेकांनी वेगवेगळ्या समस्यांवर उपाय शोधले. नातेसंबधांवर आधारित २०२१ मध्ये गुगलवर अनेक गोष्टी लोकांनी सर्च (Google Search)केल्या. ते प्रश्न लोकांच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत होते.
अनेक डेटाबेस वेबसाईट्सनुसार, हा प्रश्न सर्वात जास्त गुगल सर्च केला गेला. बंबलपासून, टिंडर ते लग्न जमविण्याच्या वेबसाइट्सपर्यंत लोकांनी खूप सर्च केला. फक्त भारतातलेच नाही तर जगभरातील लोकांचे डेटिंग जीवन धोक्यात आले होते. घरातच अडकून पडलेले अनेक लोक एकटे पडले होते. म्हणून प्रिय व्यक्तींशी संवाद साधणे त्यांना फार गरजेचे आणि अत्यावश्यक वाटले.
कुतूहलाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे चुंबन घेताना लोकांना पार्टनरला सोडावेसे वाटत नाही. त्यामुळे हा प्रश्न दुसरा सर्वात लोकप्रिय प्रश्न ठरला. या प्रश्नाची अनेक उत्तरे होती. चुंबनाचे योग्य तंत्र, टिप्स अशा विविध चुंबन कौशल्यांवर लोकांनी काम केले.
सर्वचजण घरात असल्यामुळे अनेक गोष्टी आभासी कराव्या लागत असल्याने एकमेकांच्या भावनांचा अंदाज बांधणे कठीण होते. म्हणूनच तो किंवा ती प्रतिसाद कसा देतो हे लक्षात ठेवून लोकं मॅसेजेस आणि फोनवर बोलुन जे लक्षात आले ते गुगलला विचारून लोकांनी तो किंवा ती आवडतंय का? याचे आखाडे बांधले.
जर बंधने असतील तर लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप मध्ये राहणे हे मजेशीर नाहीच. बंधने आल्यामुळे कोविड 19 मुळे अनेक जोडप्यांना लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप करावे लागले. त्यातून काहींना फायदा झाला तर काही दु:खात हरवले. त्यांना ही गोष्ट आपल्यासाठी योग्य नसल्याची जाणीव झाली. आपले प्रेम गमावण्याच्या भीतीने, लोकांनी लॉंग डिन्स्टन्स रिलेशन कसे टिकेल याबाबत अनेक प्रश्न गुगल केले. आणि त्यावर उपाय शोधून मार्ग काढला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.