KIds-Free Relationships साठी मिळेल पार्टनर, डेटिंग अ‍ॅप होणार लॉन्च

१० फेब्रुवारीला हे अ‍ॅप सुरू होणार आहे.
KIds-Free Relationships
KIds-Free Relationships
Updated on

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर मुल होणं हे दोघांमधले संबंध दृढ (Relationhip) करण्यासाठी अत्यंत महत्वाचे पाऊल मानले जाते. किंबहुना वंश वाढविण्यासाठी अनेकजण लग्नाला (Marriage) वर्ष झाल्यानंतर गुड न्यूज कधी देणार यासाठी नवरा-बायकोच्या पाठी लागतात. काहींना सहज मूल (Children) होतं. काहींना त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. तर काहींना कितीही प्रयत्न केले तरी अजिबात मूल होत नाहीत. आता तर काही मुलं-मुली ठरवूनच मुलं नको असा निर्णय घेत आहेत. यापाठीमागे त्यांची अनेक कारणं असतात. पण मुलं का नकोत हे शास्त्रशुद्ध समजून घेणारा जो़डीदार मिळाला तर! डेटींग अ‍ॅपवर (Dating App) असे विचार नेमके कळत नाहीत.

KIds-Free Relationships
सोशल मीडियावरचे प्रसिद्ध कपल 'प्रसिका'ला का नकोय मूल?

ज्यांना मुलं नकोत अशा सिंगल्ससाठी Kindred नावाचे अ‍ॅप १० फेब्रुवारीला लॉंच होणार आहे. ज्यांना मुलं नकोत असे समविचारी लोक या अ‍ॅपवर तुम्हाला भेटतील. आपल्याला कायमच समविचारी जोडीदार मिळाला तर हवा असतो. आता मुलांबाबतही कपल्स गांभीर्याने काही विचार करत आहेत. त्यामुळेच आम्ही ज्यांना मुलं नको आहेत अशाच लोकांना Kindred डेटिंग साईटवर मोकळेपणाने बोलता येईल, असे Kindred चे सह-संस्थापक, कम्युनिकेशन डायरेक्टर एलेनॉर ब्रूक-हॅच म्हणाली. kid-free relationship हवे असणारे सिंगल्स किंडड्रेडवर एकमेकांना डेट करू शकतील. हे अ‍ॅप iOS आणि Google Play Store वर उपलब्ध असेल. हे अ‍ॅप लॉन्च होण्यापूर्वी साइन अप करणाऱ्यांना सहा महिन्यांचे प्रीमियम सदस्यत्व मोफत देत आहे.

KIds-Free Relationships
एकला चलो रे... लग्न न करता सिंगल राहण्याकडे तरुणाईचा वाढला कल

Kindred चे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक, फिलिप वासौफ, म्हणाले, मी आणि एले गेल्या काही वर्षांपासून सर्व डेटिंग अ‍ॅप वापरले आहेत. त्यानंतर आम्ही एकटे राहणाऱ्या अनेक लोकांशी संपर्क केला. त्यांना मुलं नकोयत. अशाच व्यक्तींशी डेट करून लग्न करावेसे वाटते. असे अनेक लोकं आमच्या आजूबाजूला आहेत ज्यांना मुलं नकोयत. २०२१ मधील नॅशनल स्टॅटिस्टिनुसार, जवळपास 3 दशलक्ष सिंगल पालक आहेत. त्यांना आणखी मुलं नकोयत. तर, जवळपास निम्म्या ब्रिटीश स्त्रियांनी वयाची तिशी पूर्ण केली असून त्यांनाही मुले नाहीत. असा, 2020 सालचा ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्समधील आकडेवारी सांगते. त्यामुळे ज्यांना लग्नानंतर मुलं नकोयत त्यांच्यासाठी समविचारी पार्टनर याद्वारे मिळू शकतात.

KIds-Free Relationships
चाळीशीनंतर दुसरं लग्न ! जोडीदाराकडून काय असतील अपेक्षा ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.