Datta Jayanti 2023 : दत्तगुरू औदुंबरी प्रगटले! दत्त महाराजांना औदुंबराचे झाड इतके प्रिय का आहे?

औदुंबराच्या झाडाचं फुल दिसेल तो भाग्यवान,असा आशिर्वाद दत्त महाराजांनी दिलाय
Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2023esakal
Updated on

Datta Jayanti 2023 :

दत्त महाराजांच्या मंदिरे, त्यांचे अवतार आणि जिथे जिथे दत्त महाराजांचा उल्लेख येतो. तिथे तिथे एक गोष्ट दिसते ती म्हणजे औदुंबराचा वृक्ष. औंदुबराला ग्रामिण भाषेत उंबराचे झाड असेही म्हणतात. जिथे जिथे उंबराचे झाड असते तिथे तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो.

पण दत्त महाराजांना औंदुंबर इतका प्रिय का?, पुराणांत असं काय घडलं की, ज्यामुळे उंबराच्या झाडाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तर, त्यामागे अशी कथा सांगितली जाते की, हिरण्यकश्यपू राजाने घोर तप करून ब्रह्म देवांना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला माणसाकडून किंवा प्राण्याकडून मरण येणार नाही, दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही, घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही. ब्रह्मांनी तथास्तु म्हटत त्याला वर दिले आणि यामुळे त्याला वाटू लागले की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही.

Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2023 : घरात पाण्याच्या झऱ्यात सापडली सोन्याची दत्तमूर्ती, वजन शुन्य असूनही सहज उचलणे अशक्यच

त्यामुळे राजाला अहंकार झाला. त्याला देवांपेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला. अशात त्यासमोर कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद सतत देवाचे नाव घेई. प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करतच असे. वडिलांना त्यांचे जप करणे सहन होत नव्हते.

अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील भक्त प्रल्हादांचा जप सुरुच असायचा. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजाचा राग अनावर होत असे. अशात राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली. भक्त प्रल्हादाचा छळ केला,त्याला उंच कड्यावरून फेकले अन् उकळत्या तेलातही सोडले. पण भक्त प्रल्हादाच्या नखालाही धक्का लागला नाही.

Datta Jayanti 2023
गुरु पौर्णिमा पुरवणी साठी- श्री सद्गुरु शिवाय अध्यात्मिक वाटचाल परिपूर्ण होत नाही - ह.भ.प.तुकाराम भाऊ महाराज दत्त आश्रम जुनी सांगवी.

एकदा राजाने रागात येऊन जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, दाखव कुठे आहे तुझा देव. तोच प्रचंड गर्जना करत नृसिंह खांबातून प्रगटले.

नृसिहांचे हे रूप म्हणजे ना मनुष्य ना प्राणी होते. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके, उंबरठ्यावर घरात किंवा घराबाहेर नाही, सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही, अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला. कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही, असा त्याला वर होता. प्रल्हादाची भक्ती बघून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले.

ही कथा तर आपल्याला माहितीच आहे. पण या पुढे जेव्हा नृसिह अवतारातील भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तेव्हा त्याच्या पोटात असलेले विष भगवंतांच्या नखांना लागले. त्यामुळे भगवंतांच्या हाताची आग होऊ लागली. ती काही केल्या शांत होईना. त्यावेळी माता लक्ष्मींनी भगवंतांना औंदुंबराला लागणाऱ्या उंबराच्या फळामध्ये नखं खोचून ठेवण्यास सांगितले. या उपायाने नृसिह भगवंतांची हाताची होणारी आग थांबली. त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवंतांचा वास या झाडाच्या मुळाशी असतो, अशी मान्यता आहे. (Datta Jayanti 2023)

Datta Jayanti 2023
भक्तिभाव, निष्ठाभाव विकत मिळत नाही : परमात्मराज महाराज : श्री दत्त देवस्थान मठाच्यावतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त प्रवचन

असंही सांगितलं जातं की, नृसिह भगवंत ज्या खांबातून अवतरले तिथे हे औंदुंबराचे झाड उगवले. भक्त प्रल्हादाने त्या औदुंबराच्या झाडाची अफाट अशी भक्ती केली. त्या ठिकाणी बघा त्यावेळेला स्वतः दत्तगुरु त्या ठिकाणी आले आणि भक्त प्रल्हादांना सांगितले की, औदुंबरच्या झाडाखाली मी स्वतः येईल त्या ठिकाणी सरस्वतींनी भगवान दत्तात्रयाचा अवतार त्यांनी स्वतः या ठिकाणी तपश्चर्या केली.

असंही सांगितलं जातं की, दत्त महाराज एकदा अती क्रोधीत होते. तेव्हा चालत ते औदुंबराच्या वृक्षाखाली आले आणि अचानक त्यांचा क्रोध शांत झाला. महाराष्ट्रामध्ये देशांमध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्तगुरु महाराजांची मंदिरात त्या ठिकाणी औदुंबराच झाड हे निश्चित आहे.

औदुंबराच्या झाडाला येणारं फुलही आश्चर्यचकीत करणारं आहे. ज्याच्या नशिब भाग्यवान असेल त्यालाच औदुंबराचे फुल दिसते. त्या फुलाचे दर्शन जर झालं तर साक्षात दत्तगुरूंची कृपा त्या व्यक्तीवरती आहे म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.