Deafness Issue: किशोरवयीन मुलांमध्ये वाढतोय बहिरेपणा; BMIचा धक्कादायक खुलासा

हेडफोन्समुळे जगभऱ्यातील एक अब्जाहून अधिक किशोवयीन मुलांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
Deafness Issue
Deafness Issueesakal
Updated on

Health Issues: आजकालची पिढी हेडफोन, इअरबड्सचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येतात. मात्र याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर किती प्रमाणात होऊ शकतो याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. हेडफोन्समुळे जगभऱ्यातील एक अब्जाहून अधिक किशोवयीन मुलांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बीएमआय ग्लोबल हेल्थच्या नियतकालिकात या संदर्भात एक लेख प्रसिद्ध करण्यात आलंय. या लेखात लोकांच्या श्रवणक्षमतेवर परिणाम करणारी काही धक्कादायक कारणे पुढे आलीत. ही समस्या गंभीर असून याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे. (Health)

बीएमआय ग्लोबल हेल्थ या संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये १२ ते ३४ वर्षे वयोगटातील मुले, युवकांचा समावेश होता. बऱ्याचदा आपण गाणी ऐकण्यासाठी किंवा तासंतास फोनवर बोलण्यासाठी हेडफोनचा वापर करतो. मात्र सतत मोठ्या आवाजात गोष्टी ऐकत राहिल्याने तुमच्या श्रवणशक्तीवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे बहिरेपणा येण्याचा धोका वाढतो. तरीदेखील आजची पिढी या गोष्टींकडे सर्सास दुर्लक्ष करते.

Deafness Issue
Cotton Ear Buds: कानातला मळ कॉटन बड्सने साफ करणं योग्य की अयोग्य? वाचा योग्य पद्धत

लोक हेडफोन, इअरबड्स वापरणारे ध्वनीची पातळी १०५ डेसिबलपेक्षा अधिक ठेवून कार्यक्रम, गाणी ऐकतात. कुठल्याही गाण्याच्या आवाजाची पातळी १०४ ते ११२ डेसिबलच्या दरम्यान असते. प्रौढ व्यक्तींनी ८० डेलिबलपेक्षा व लहान मुलांनी ७५ डेलिबल एवढ्या डेसिबलमध्येच गाणी ऐकायला हवीत. अन्यथा कमी वयातच तुम्हाला बहिरेपणाचा त्रास जाणवू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()