Decoration Ideas : सत्यनारायणाच्या पूजेकडे पाहून डोळेच दिपतील; मंदिर अन् घर अशा पद्धतीने सजवा!

भगवान विष्णूंची कृपा व्हावी असं वाटत असेल तर या टिप्स करतील मदत
Decoration Ideas
Decoration Ideas esakal
Updated on

Decoration Ideas : श्रावण हा पवित्र महिना मानला जातो. श्रावणात केलेले उपवास, व्रत वैकल्य, घरात घातलेली सत्यनारायण पूजा याला एक वेगळेच महत्त्व आहे. श्रावणात घरात घातलेली सत्यनारायण पूजा अनेक महापुजेचे पुण्य मिळवून देते असं म्हणतात. त्यामुळेच घरोघरी श्रावणात पूजा घातली जाते.

पुजेच्या प्रसादाच्या निमित्ताने घरात गोडाधोडाचे जेवण, अन् चार लोकांना अन्नदान केल्याचेही पुण्य मिळते. त्यामुळेच शहरात राहणारे लोकही इतक कोणतं नाही पण हे सत्यनारायण पूजा घालण्याचं मनावर घेतात.

सत्यनारायण पुजेला विशेष मान असल्याने ती उत्साहात पार पाडली जाते. खेडोपाडी तर आजही नंबर लावून पूजा घातली जाते. त्यामुळे रोज एकाच्या तरी घरी आमंत्रण असतंच. शहरात जेवण घालणं शक्य नसलं तरी प्रसादाचा शिरा आणि पंचामृत दिले जाते.

तर गावी आजही मोठ मोठ्या पंगती उठतात. तुम्हीही यंदा हे पुण्य पदरात पाडून घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. (Decoration Ideas : home temple decoration idea on satyanarayan swami puja)

Decoration Ideas
Shravan 2023 : भगवान शिवशंकरांना पहिल्यांदा कावड अभिषेक कोणी घातला? या परंपरेचं महत्त्व काय!

भगवान श्री विष्णूंना जगाचे पालन करता म्हटले जाते. हे विश्व फक्त श्री हरी नारायण चालवतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावणात सत्यनारायण रूपाची प्रत्येक घरात पूजा केली जाते. या पूजेत सत्यनारायण स्वामींचे व्रत देखील ठेवले जाते आणि घरी पूजा घातली जाते.

ज्या घरामध्ये सत्यनारायण स्वामींची कथा किंवा पूजेचे आयोजन केले जाते तेथे विशेष सजावट देखील केली जाते. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, जर तुम्‍हाला घरी सत्यनारायणाची पूजा घालायची असेल तर तुम्ही घराचे मंदिर आणि पूजा कशी सजवावी.

केळीच्या पानांची सजावट

हिंदू लोक केळीची पाने अत्यंत पवित्र मानतात. या वृक्षात देवगुरु बृहस्पती वास करतात. सत्यनारायण स्वामीजींच्या पूजेमध्ये केळीच्या पानांचा वापर अनिवार्य आहे कारण भगवान विष्णूंना केळीचे फळ, केळीचे फूल इत्यादी अर्पण केले जातात. (Banana Tree)

केळीच्या पानांनी तुम्ही तुमचे घर मंदिर अनेक प्रकारे सजवू शकता.

  • जर तुमच्या घराच्या मंदिरात 4 खांब असतील तर प्रत्येक खांबावर केळीचे पान कलव्याच्या मदतीने बांधा.

  • मंदिरामागील भिंतीवर तुम्ही 4 केळीची पाने चिकटवू शकता.

  • तुम्ही 4 केळीच्या पानांनी मंडप बनवू शकता.

  • या मंडपाच्या मध्यभागी मंदिराची स्थापना करता येते.

पूजेच्या बाजूला तुम्ही आकर्षक कलशात केळीचे खांब उभे करू शकता
पूजेच्या बाजूला तुम्ही आकर्षक कलशात केळीचे खांब उभे करू शकताesakal
Decoration Ideas
Shravan fasting Recipe : उपवासाला कधी अप्पे खाल्लेत का? ही घ्या टेस्टी बटाट्याच्या अप्प्यांची सोपी रेसिपी

अशोकाच्या पानांनी सजवा

केळीच्या पानांप्रमाणेच अशोकाच्या झाडाची पानेही खूप शुभ मानली जातात. वास्तूनुसार घरामध्ये अशोकाचे झाड लावणे खूप फायदेशीर आहे. घरामध्ये झाड लावता येत नसेल तर घराच्या प्रवेशद्वारावर अशोकाच्या पानांचा बंडनवार लावावा. घरातील त्रास कमी करण्यासाठी अशोकाची पाने सर्वात सोपी आणि प्रभावी उपाय आहेत.

यामुळे घरातील दुःख आणि गरिबी दूर होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. अशा परिस्थितीत, सत्यनारायण स्वामींच्या कथेच्या वेळी, तुम्ही अशोकाच्या पानांनी देखील मंदिर सजवू शकता. (Ashoka Tree)

कशी कराल पानांची मांडणी

  1. अशोकाची पाने आणि झेंडूच्या फुलांनी डिझायनर कमान बनवा.

  2. अशोकाची पाने आणि झेंडूच्या फुलांचीही रांगोळी काढता येते.

  3. अशोकाची पाने ठेवून कलश सजवू शकता.

शोकाची पाने आणि झेंडूच्या फुलांनी कमान किंवा माळ बनवता येईल
शोकाची पाने आणि झेंडूच्या फुलांनी कमान किंवा माळ बनवता येईलesakal
Decoration Ideas
Shravan Special Recipe : भालेनाथांना प्रसन्न करण्यासाठी खास कलाकंदचा नैवेद्य, लगेच नोट करा टेस्टी रेसिपी

झेंडूच्या फुलांनी मंदिर सजवा

पिवळा रंग भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. आणि म्हणूनच त्यांच्या पूजेत झेंडूच्या फुलाचा वापर केला जातो. जर तुमच्या घरीही सत्यनारायण स्वामीजींची पूजा होत असेल तर तुम्हीही तुमच्या घरातील मंदिर झेंडूच्या फुलांनी सजवा. (Flower Decoration)

कशी कराल सजावट

  1. झेंडूच्या फुलांनी तुम्ही मंदिराच्या खोलीच्या भिंती सजवू शकता.

  2. झेंडूच्या फुलांसह गुलाबाच्या फुलांचा किंवा पांढऱ्या रंगाच्या फुलांचा हार करून मंदिराची सजावट करू शकता.

  3. झेंडूच्या फुलांचा गुच्छ बनवूनही तुम्ही मंदिर सजवू शकता.

ही सजावट पूजेच्या मागील बाजूस आकर्षक वाटेल

ही सजावट पूजेच्या मागील बाजूस आकर्षक वाटेल
ही सजावट पूजेच्या मागील बाजूस आकर्षक वाटेलesakal
Decoration Ideas
Shravan 2023 : एका सासऱ्याला होता स्वत:च्याच जावयाचा तिटकारा, ते राजा दक्ष कोण होते?

आकर्षक रांगोळी काढावी

भारतीय संस्कृतीत रांगोळाला खूप महत्त्व दिले गेले आहे. प्रत्येक तीज सणाला घरोघरी रांगोळी काढण्याची परंपरा आहे. रांगोळी काढल्याने घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही रांगोळीही काढू शकता.

अशी काढा रांगोळी

  • घरातील सगळ्या प्रकारची धान्ये घेऊन तुम्ही रांगोळी बनवा. रांगोळी काढण्याची ही सर्वात प्राचीन पद्धत आहे.

  • फुलांच्या रांगोळीने मंदिर सजवा. यासाठी झेंडू आणि गुलाबाची फुले वापरू शकता.

  • सत्यनारायण स्वामींच्या पूजेमध्ये तांदूळ आणि काळ्या तिळाचे विशेष महत्त्व आहे. या दोघांच्या मदतीने तुम्ही रांगोळीही तयार करू शकता. तुम्ही फक्त तांदळाच्या पेस्टने अल्पना तयार करू शकता.(Rangoli Designs)

फुलांच्या रांगोळीने मंदिर सजवा
फुलांच्या रांगोळीने मंदिर सजवाesakal
Decoration Ideas
Shravan 2023 Healthy Recipes: पावसाळ्यात हेल्दी राहण्यासाठी कुट्टूचं पीठ फायदेशीर, श्रावणात उपवासासाठी करा कुट्टूच्या पीठाच्या विविध रेसिपी

तुळशीची पाने वापरा

तुळशीच्या पानांना खूप महत्त्व दिले गेले आहे. या पानांचे सेवन केल्याने आरोग्यालाही फायदा होतो आणि घरात तुळशीचे रोप असल्यास सुख-समृद्धी येते. तुळशीला भगवान विष्णूंनाही खूप प्रिय आहे, कारण तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. घरातील मंदिर सजवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर कसा करू शकतो ते आम्ही तुम्हाला सांगतो. (Tulasi)

  1. तुळशीच्या पानांची माळ करून मंदिराला सजवावे.

  2. तुम्ही सत्यनारायण स्वामींना तुळशीची माळही अर्पण करू शकता.

  3. काही लोक पूजेच्या प्रसादावरही तुळशीचे पान ठेवतात ज्यामुळे प्रसाद आकर्षकही दिसतो अन् तो आरोग्यासाठी अधिक फलदायी बनतो.

तुळशीची माळ तुम्ही चौरंग अन् देवाच्या फोटोंना घालू शकता
तुळशीची माळ तुम्ही चौरंग अन् देवाच्या फोटोंना घालू शकताesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()