Deepika-Ranveer Baby : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पादूकोण यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. नुकतीच दीपिका आणि रणवीरने ही गोड बातमी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून शेअर केली आहे.
मागील कित्येक दिवसांपासून दीपिका गरोदर असल्याच्या अफवा होत्या. आज अखेर दीपिका आणि रणवीरने ही बातमी कन्फर्म केली आहे. सप्टेंबर महिन्यात दीपिकाच्या बाळाचे आगमन होणार आहे. आज आपण ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या बाळामध्ये काय कलागुण असतात? याबद्दल जाणून घेणार आहोत.
सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुला-मुलींची राशी ही कन्या किंवा तूळ असू शकते. या दोन्ही राशींमध्ये आढळून येणारा प्रभावी गुण म्हणजे दयाळूपणा होय. हे लोक सर्वांप्रती अधिक दयाळू आणि संवेदनशील असतात. या कारणामुळे, सप्टेंबर महिन्यात जन्माला येणारी मुले आणि मुली यांना मोठ्या मनाची माणसे, असे म्हटले जाऊ शकते.
एका ब्रिटिश अभ्यासात असे दिसून आले आहे की, या महिन्यात जन्माला येणारे बाळ हे शाळेत उत्कृष्ट कामगिरी बजावते. शिवाय, या महिन्यात जन्मलेल्या मुलांचा उच्चभ्रू शाळेमध्ये प्रवेश होण्याची शक्यता २०% अधिक असते.
सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांची उंची ही इतर महिन्यात जन्मलेल्या मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या मुलांमध्ये खेळाची विशेष आवड दिसून येते. त्यामुळे, शाळेत ही मुले विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होताना दिसतात.
सप्टेंबर महिन्यात जन्माला येणारी मुले ही उन्हाळ्यात जन्माला आलेल्या मुलांच्या तुलनेत अधिक बलवान आणि खेळात तरबेज असतात. या महिन्यात जन्माला येणाऱ्या बाळाला क्रीडा क्षेत्रातील विविध खेळांची विशेष आवड असते. विशेष म्हणजे ही मुले क्रीडा क्षेत्रात भरपूर यश कमावू शकतात.
या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये प्रभावी नेतृत्व गुण दिसून येतात. ते ज्या क्षेत्रामध्ये जाऊन करिअर करतात, त्या संबंधित क्षेत्रातील कामाचे किंवा व्यवसायाचे नेतृत्व करण्याची शक्यता असते.
सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये लिडरशिपचे टॅलेंट दिसून येते. याची अनेक उदाहरणे तुम्हाला पाहता येतील. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अक्षय कुमार, राधिका आपटे आणि करिना कपूर इत्यादी सेलिब्रिटींचा ही जन्म सप्टेंबरमध्ये झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.