Deepika Padukone Skincare : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘मस्तानी गर्ल’ दीपिका पादूकोण तिच्या उल्लेखनीय अभिनयासाठी ओळखली जाते. दीपिका गरोदर असून, ती लवकरच तिच्या चाहत्यांना गुडन्यूज देणार आहे. दीपिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. गरोदरपणात ही ती तिचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. गरोदरपणात तिची त्वचा चमकदार आणि निरोगी दिसून येते.
तिने नुकतेच तिच्या त्वचेचे रहस्य चाहत्यांसोबत शेअर केले आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून, त्यात तिने तिच्या स्किनकेअर रूटीनबद्दल महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्हाला ही दीपिकासारखी सुंदर त्वचा हवी असेल तर तिने सांगितलेले हे स्किनकेअर रूटीन जाणून घेऊयात.
दीपिकाने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या स्किनकेअरबद्दल सांगितले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलयं की, जेव्हा त्वचेची काळजी घेण्याचा प्रश्न येतो, तेव्हा अशावेळी योग्य आहार, पुरेशी झोप, हायड्रेशन आणि हालचाल या गोष्टी महत्वाच्या ठरतात.
परंतु, रोजच्या साध्या आणि सातत्यपूर्ण स्किनकेअर रूटीनमुळे मला माझ्या त्वचेची उत्तम प्रकारे काळजी घेता येते. यामध्ये ३ सोप्या स्टेप्सचा समावेश आहे. क्लीन्झ, हायड्रेट आणि प्रोटेक्ट होय.
दीपिकाने पुढे तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, आठवड्यातून कधीकधी असा एक दिवस येतो की, तेव्हा मला काहीतरी वेगळे करावेसे वाटते. अशावेळी मी फूल बॉडी मसाज, फेसपॅक आणि हेअरमास्क वापरते. पुढे तिने चाहत्यांसाठी तिच्या रोजच्या स्किनकेअर रूटीनमध्ये समाविष्ट असणाऱ्या गोष्टींची यादी देखील शेअर केली आहे.
दीपिका तिच्या रोजच्या स्किनकेअर रूटीनची सुरूवात चेहऱ्यावर क्लिंजर लावून करते. क्लिंजिंग करून ती चेहरा स्वच्छ करते. त्यानंतर, डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा कोणत्याही प्रकारची समस्या दूर करण्यासाठी ती आयक्रीम वापरते.
दीपिकाचा स्किनकेअरचा स्वत:चा ब्रॅंड आहे. या ब्रॅंडचे नाव 82e असे आहे. ती या ब्रॅंडचे अश्वगंधापासून बनवलेले मॉईश्चरायझर चेहऱ्याला लावते. त्यानंतर, ती हळदीयुक्त सनस्क्रिन चेहऱ्याला लावते. त्यानंतर, ती डाळिंबापासून बनवलेले लिप ऑईल ओठांना लावते.
यासोबतच ती खास चमकदार त्वचेसाठी मंजिष्ठीपासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावते. जर तुम्हाला ही दीपिकासारखीच ग्लोईंग आणि हेल्दी त्वचा हवी असेल तर तुम्ही तिचे हे डेली स्किनकेअर रूटीन फॉलो करू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.