Dengue Home Remedies : डेंग्यूच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नयेत हे पदार्थ, शरीरात विषाणू दुप्पट वाढतील

डेंग्यूची लक्षणे कोणती?
Dengue Home Remedies
Dengue Home Remediesesakal
Updated on

Dengue Home Remedies : पावसाळा संपत आला की व्हायरल आजार पसरतात. व्हायरल आजारांमध्ये न्युमोनिया, इफेक्शन, डेंग्यू, टायफॉईड याचा समावेश असतो. डास चावल्याने होणाऱ्या डेंग्यूकडे वेळीच लक्ष दिले नाही. तर तो रूग्णाचा जीवही घेऊ शकतो. कारण

डेंग्यूचा मारा थेट रूग्णाच्या रक्तपेशींवर हल्ला करतो. रक्तातील पेशी कमी झाल्या की अशक्तपणा जाणवू लागतो. आणि रक्तातील पेशी वाढल्या नाही तर रूग्णाचा मृत्यूही होतो.

डेंग्यूवर अनेक घरगुती उपायही प्रसिद्ध आहेत. डेंग्यूमध्ये पपईची पाने खाणे फायद्याचे ठरते. हा उपाय अनेक लोकांना माहिती आहे. पण, डेंग्यूमध्ये काय खाऊ नये हे फार कमी लोकांना माहिती आहे.(Dengue patients should not eat this food)

Dengue Home Remedies
Dengue vaccine : डेंगीविरोधातील लस निर्मितीची तिसरा टप्पा सुरू

डेंग्यूची लक्षणे कोणती

१.स्नायू आणि सांधे दुखणे

२.शरीरावर रॅशेश येणे

३. तीव्र डोकेदुखी

४. डोळ्यांत अस्वस्थता जाणवणे

५. उलट्या होणे आणि मळमळ होणे

मसालेदार पदार्थ

डेंग्यूची लक्षण असताना मसालेदार पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. याचे कारण असे की, मसालेदार अन्नामुळे पोटात जळजळ होऊ शकते आणि डेंग्यूची लक्षणे आणखी वाईट होऊ शकतात. मसालेदार अन्न देखील रक्तस्त्राव वाढवू शकते. मसालेदार अन्न डेंग्यूची तिव्रता आणखी वाढवतात.

Dengue Home Remedies
Jalgaon Dengue Disease : शिरसोलीत तरूणाला डेंग्युचा डंख; उपचारादरम्यान मृत्यु

सॅलिसिलेटचे पदार्थ

सॅलिसिलेट हे एक प्रकारचे संयुग आहे, जे रक्त पातळ करू शकते. डेंग्यूच्या रूग्णांनी सॅलिसिलेट समृध्द अन्न टाळावे, ज्यात लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो, आले, लसूण, कांदा, अक्रोड, बदाम, बटाटे, टोमॅटो, जर्दाळू, काकडी, द्राक्षे आणि डाळिंब यांचा समावेश आहे. त्यामुळे डेंग्यूतून बरे होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो.

मांसाहार

डेंग्यूच्या रुग्णांना मांसाहार देऊ नये. मांसाहार जास्त मसालेदार आणि पचायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत डेंग्यूच्या रुग्णांच्या अडचणी वाढू शकतात. एवढेच नाही तर मांसाहारी खाल्ल्याने संसर्गाचा धोकाही वाढतो.

Dengue Home Remedies
Dengue Fever in Children: लहान मुलांमध्ये डेंग्यूची झपाट्याने वाढ, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

कॅफिन

कॅफीनयुक्त पेये शरीराचे निर्जलीकरण करू शकतात, जे डेंग्यू रुग्णांसाठी हानिकारक आहे. एवढेच नाही तर डिहायड्रेशनमुळे प्लेटलेट्स रिकव्हरीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. कॅफिन व्यतिरिक्त, डेंग्यूच्या रुग्णांनी अल्कोहोल देखील टाळावे, ज्यामुळे प्लेटलेट्स कमी होतात.

जंक फूड

वास्तविक, जंक फूड कोणासाठीही चांगले नाही आणि ते नेहमी टाळले पाहिजे. डेंग्यूच्या रुग्णांसाठी जंक फूड अधिक हानिकारक आहे. त्यामुळे डेंग्यूतून बरे होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. याशिवाय तळलेले पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.