Detox Drink : रात्रभर पाण्यात भिजवलेले हे पदार्थ शरीर करतील डिटॉक्स, Weigh Loss साठी जालीम उपाय!

बाजारात अनेक पेय अशी आहेत जी वजन कमी करण्यात मदत करतात
Detox Drink
Detox Drinkesakal
Updated on

Detox Drink : अनेकदा आपण आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतो. पण जे लोक आरोग्याबाबत जागरूक असतात, ते गरम पाणी पितात किंवा मध, लिंबाचा रस आणि गरम पाणी पितात. यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. पण जर आम्ही तुम्हाला आणखी एक पेय आहे जे तुम्हाला आणखी फायदे देईल.

होय, या पेयांऐवजी काकडी, लिंबू आणि पुदिन्याचे पाणी प्या. यासाठी काकडी, लिंबू आणि पुदिना रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्या. हे पाणी प्यायल्याने तुम्हाला काही फायदे होतील. हे तिन्ही तुमचे आरोग्य उत्तम ठेवतील.

याशिवाय तुम्हाला डागरहित आणि चमकणारी त्वचाही मिळेल. म्हणूनच तुम्ही हे पाणी रोज सकाळी सेवन केले पाहिजे.जर तुम्हाला हवे असेल तर दिवसभरात हे पाणी थोडे थोडे पिऊ शकता. यातून तुम्हाला कोणते फायदे मिळतात याची माहिती घेऊयात.

Detox Drink
वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी ट्राय करा हे 5 DETOX DRINK

बाजारात अनेक पेय अशी आहेत जी वजन कमी करण्यात मदत करतात. त्यापैकीच एक पेय म्हणजे काकडीचे पाणी. असे मानले जाते की हे जादुई पेय कॅलरी कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी चमत्कारीत पेय ठरते. चला तर जाणून घेऊया काकडीचे पाणी वजन करण्यासाठी कसे काय मदत करते?

काकडी जीवनसत्त्वं सी आणि के, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, फ्लेव्होनॉइड्स, अँटिऑक्सिडंट्स आणि फॉस्फरस सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असते. वजन कमी करण्यासाठी आहारात काकडीचा समावेश केल्याने पचनक्रिया मजबूत होते.

बद्धकोष्ठते सारख्या त्रासदायक समस्या दूर होतात. काकडीमध्ये कमी कॅलरीज आणि अधिक विद्रव्य फायबर्स असतात जे हायड्रेशन आणि जलद वजन कमी करण्यास मदत करतात.

कसे बनवायचे हे डिटॉक्स वॉटर

  • काकडीचे तुकडे

  • लिंबूच्या फोडी

  • पुदिन्याची पाने

  • पाणी

एका काचेच्या बरणीत काकडीचे काही तुकडे, लिंबाचे काप घाला. आता पुदिन्याची पाने घाला आणि थोडा लिंबाचा रस घाला. नंतर पाणी घाला आता हे पाणी तुम्ही दिवसभरही पिऊ शकता आणि सकाळी उठल्यावरही. त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात.

Detox Drink
Black Detox Idli Video : हाईट झाली! बाजारात 'काळी इडली' आली!

जाणून घ्या डिटॉक्स वॉटर पिण्याचे फायदे


या पाण्याने तुमचे शरीर दीर्घकाळ हायड्रेटेड राहील. कारण त्यामध्ये असलेल्या काकडीत 95 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. याशिवाय त्यात थंड करण्याचे गुणधर्मही आढळतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला उष्णतेपासून आराम मिळतो. दुसरीकडे, लिंबूमध्ये असलेल्या ऍसिडिक गुणधर्मांमुळे पचन बरोबर राहते. पुदिन्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.


हे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया बरोबर राहते.चयापचय दर वाढतो.चरबी आणि कॅलरीज बर्न होतात.दीर्घकाळ पोट भरलेले वाटते ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटते.वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Detox Drink
Body Detox : शरीराला डिटॉक्स करतील ही पेये

रोज सकाळी हे पाणी प्यायल्याने पचनशक्ती चांगली राहते.पचनक्रिया गतिमान होते.पचनशक्ती मजबूत होऊन पोट सहज साफ होते.मला जाणे सोपे होते व बद्धकोष्ठता दूर होते.

या पाण्यात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे तुमचे शरीर पूर्णपणे डिटॉक्स करतात. शरीरातील खराब पदार्थ लघवीद्वारे सहज बाहेर काढले जातात.

हे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते.शरीरातून घाण बाहेर पडते, ज्यामुळे त्वचा देखील सुधारते.मुळ आणि मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळतो.त्वचेचा रंग स्पष्ट होतो.

लिंबू, पुदिना आणि काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स असतात, अशा स्थितीत ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.