Diabetes Diet : तूर,मूग की उडीद? ; यापैकी एक आहे मधुमेहाच्या रूग्णांसाठी संजीवनी बूटी, कशी खायची ते पहा

या डाळीचा समावेश आहारात केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं
Diabetes Diet
Diabetes Dietesakal
Updated on

 Diabetes Diet : घरोघरी मातीच्या चुली, ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. ती प्रत्येक घरातल्या व्यक्तीच्या स्वभाव आणि वादावर बोलली जाते. पण, ही म्हण आता एका आजाराबाबतीतही म्हटली जाऊ शकते. तो आजार म्हणजे मधुमेह.

होय, आजकाल घरोघरी मधुमेहाचे रूग्ण तयार होत आहेत. काही लोकांना अनुवंशिक तर काहींना खाण्याच्या सवयींमुळे मधुमेहाची सुरूवात होते. मधुमेही रूग्णांसाठी वेगळं डायट फॉलो करावं लागतं. त्यांना अनेक पदार्थ खाण्याच्या इच्छेवर पाणी फिरवावं लागतं. हा आजारासाठी अनेक औषधे असली तरी तुम्हाला तुमच्या खाण्यावर नियंत्रण मिळवावं लागतं.       

तुम्हीही मधुमेहाचा सामना करत असाल, तर तुम्हाला काय खायचं हे कोड पडलं असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या डाळीचा समावेश आहारात केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. (How to control sugar naturally)

Diabetes Diet
Snacks For Diabetics:  मधुमेहाच्या रूग्णांना द्या हाच नाश्ता, झटक्यात रक्तातली साखर वितळते की नाही पहाच!

कोणती डाळ खायची

घरात सगळ्या डाळींच्या भाज्या, आमटी बनवल्या जातात. त्यात अनेक प्रथिने आणि पोषक तत्वे असतात. त्यामुळेच त्याचा भाजी, आमटी, वेगवेगळे स्नॅक्स बनवून खाल्ले जातात. मधुमेही रूग्णांनी उडीद डाळ खाणे फायद्याचे ठरणार आहे.

उडीद डाळीचे गुणधर्म कोणते?

उडीद डाळ चवीला उत्तम असण्यासोबतच आरोग्यासाठीही परिपूर्ण आहे. त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह सारखे आवश्यक पोषक घटक आढळतात. या डाळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे तुमची भूक नियंत्रित ठेवते, तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे.

जो रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या आहारात उडीद डाळीचा समावेश करू शकता, ज्यामुळे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहते. (Diabetes)

Diabetes Diet
Snacks For Diabetics:  मधुमेहाच्या रूग्णांना द्या हाच नाश्ता, झटक्यात रक्तातली साखर वितळते की नाही पहाच!

उडीद डाळ तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता

खिचडी

ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी खिचडी हा अतिशय आरोग्यदायी आहार आहे. खिचडी ही विविध प्रकारच्या डाळींपासून बनवली जाते. यासाठी तुम्ही चणा डाळ, मूग डाळ किंवा उडीद डाळ वापरू शकता. त्यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. खिचडी चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही भाज्यांचाही वापर करू शकता, पण ते बनवण्यासाठी कमी तेल वापरा.

उडीद डाळीचा पराठा

मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाश्ता खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला काही चविष्ट खायचे असेल तर तुम्ही उडीद डाळीपासून बनवलेला पराठा खाऊ शकता. तुम्ही त्यात मेथीची पानेही मिसळू शकता, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. वाढत्या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी या दोन्ही गोष्टी उपयुक्त आहेत.

कढी भात

भात आणि कढी कोणाला आवडत नाही? उडदाच्या डाळ कढी मधुमेहाच्या रुग्णांसाठी बनवता येते. यामध्ये दही आणि इतर मसाले वापरता येतात. उडीद डाळ कढीमध्ये बेसनाचा वापर केला जात नाही. उडीद डाळ कढीचा आस्वाद भातासोबत घेता येतो. (Recipe)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.