Diabetes Patch: नवरात्रीत कतरिनाच्या हातावर असलेले 'डाबिटीज पॅच' नेमकं कसं कार्य करतं, वाचा सविस्तर

Katrina Kaif: कतरिनाच्या हातावर असलेले डाबिटीज पॅच नेमकं कसं कार्य करते हे जाणून घेऊया.
Katrina Kaif Diabtets Patch
Katrina Kaif Diabtets Patch Sakal
Updated on

Diabetes Patch: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मिडियावर चर्चेत असते. नवरात्री दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तिच्या हातावर डायबिटीज पॅच दिसत आहे. अनेक सेलिब्रेटी मधुमेहासारख्या आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता पसरविण्यात मदत करतात, जेणेकरून सामान्य लोकांना या विषयांबद्दल अधिक माहिती मिळू शकेल आणि त्यांना स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल.

खरं तर डायबेटिस पॅच हे आधुनिक तंत्रज्ञान आहे, जे विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी तयार करण्यात आले आहे. हा पॅच त्वचेवर चिकटवून लावला जातो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. यात सूक्ष्म सेन्सर असतात, जे रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजतात. मधुमेह पॅचचा उद्देश रक्तातील साखरेचे सतत निरीक्षण करणे आणि मधुमेह व्यवस्थापन अधिक सोयीस्कर बनवणे आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मधुमेह पॅचमुळे मधुमेह व्यवस्थापन सोपे आणि प्रभावी झाले आहे. याद्वारे, रुग्ण त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये कमी अडथळे आणून त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात. यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते. डायबिटीज पॅचचे अनेक फायदे आहेत हे आज समजून घेऊया.

रक्तातील साखरेवर नियंत्रण

डायबिटिज पॅच 24 तास रक्तातील साखरेची पातळी सतत मोजू शकतो. हा डेटा रिअल-टाइममध्ये स्मार्टफोन किंवा मॉनिटरिंग डिव्हाइसवर पाठविला जातो. यामुळे रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सहजपणे ट्रॅक करता येते. या प्रकारचे सतत निरीक्षण केल्याने रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखरेचे चढउतार समजण्यास आणि योग्य वेळी योग्य उपचार घेण्यास मदत मिळते.

आरामदायी सुविधा

डायबिटीज पॅच वापरण्यासाठी बोटातून वारंवार रक्त काढण्याची गरज नाही. यामुळे वेदनारहित आणि आरामदायी सुविधा आहे. ज्यांना वारंवार रक्त तपासणी करताना वेदना होतात, त्यांच्यासाठी ही एक अतिशय सोयीची पद्धत आहे.

अलार्म आणि नोटिफिकेशन

डायबिटिज पॅचमध्ये अनेकदा एक अलार्म फिचर असते. जे रक्तातील साखर खूप जास्त किंवा कमी झाल्यास रुग्णाला सतर्क करते. यामुळे रुग्णाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित माहिती मिळते आणि वेळीच उपचार घेता येतात.

बचत आणि उत्तम

डायबिटिज पॅचचा वापर केल्याने डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही रक्तातील साखरेचे नमुने आणि ट्रेंड समजण्यास मदत मिळते. यामुळे डॉक्टरांना रुग्णाच्या औषधांचा डोस आणि पथ्ये नियंत्रणात ठेवता येते. या प्रकारच्या चांगल्या व्यवस्थापनामुळे मधुमेहावर वेळीच उपचार करणे सोयिस्कर जाते.

हा पॅच त्वचेला सहज चिकटतो आणि बराच काळ टिकतो. त्याच्या वापराने एखादी व्यक्ती व्यायाम करणे, काम करणे आणि झोपणे यासारख्या कोणतेही दैनंदिन कार्य करू शकतो.

इतर प्रकारचे डायबिटिज पॅच

इन्सुलिन डिलिव्हरी पॅच

काही पॅच असे आहेत जे इन्सुलिन सोडण्याचे काम करतात. हे पॅचेस शरीरात योग्य वेळी इन्सुलिन सोडतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

हायब्रीड पॅच

हे पॅचेस इन्सुलिन सोडण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. ही एक प्रकारची ऑटोमॅटिक सिस्टिम म्हणून काम करतात.

पुढील गोष्टी ठेवाव्या लक्षात

डायबिटिज पॅच वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्याव. कारण प्रत्येकाची स्थिती आणि गरज वेगळी असू शकते.

डायबिटिज पॅच महाग असू शकते. हा सर्वांसाठी पर्यायी मार्ग नसतो. यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.