Diet-Exercise : वातावरणातील बदलांवर करा ‘आहार-व्‍यायामा’ने मात

exercise food time
exercise food timeesakal
Updated on

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणात कडाक्‍याची थंडी निर्माण झालेली असताना अचानक ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. वातावरणातील या बदलांचा सामना करताना निरोगी राहाण्यासाठी व्‍यायाम, आहारावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे. श्‍वसनाचे विकार असलेल्‍या व्‍यक्‍तींसह लहान मुले व ज्‍येष्ठ नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्‍ला दिला जातो आहे.

exercise food time
Anxiety Disorders : एंझायटीने ४ कोटी लोक त्रस्त, चिंता करण्याऐवजी 'अशी' घ्या काळजी

काही दिवसांपूर्वी नाशिकमधील अनेक ठिकाणचे तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत खालावले होते. आरोग्‍यवर्धक असे वातावरण असले तरी सर्दी, खोकल्‍यासह आरोग्‍यविषयक तक्रारींमध्ये वाढ झाल्‍याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. अशात गेल्‍या दोन दिवसांपासून शहरासह जिल्‍ह्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. या वातावरणात रोगराई अधिक प्रमाणात पसरण्याची शक्‍यता लक्षात घेता, सावधगिरीचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे. विशेषतः ढगाळ वातावरणामुळे हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी-अधिक होत असल्‍याने श्‍वसनाचे विकार असलेल्‍या व्‍यक्‍तींनी, तसेच ज्‍येष्ठ नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे.

exercise food time
Late Pregnancy : तिशीच्या आत मुलं होऊ द्या, असं का म्हणतात? वय आणि फर्टिलिटी कनेक्शन जाणून घ्या

...अशी घ्या काळजी

* पहाटे, सकाळी चालणे, धावण्याचा व्‍यायाम सुरू ठेवावा

* योग, प्राणायाम, ध्यानधारणेतून श्‍वसनाचे व्‍यायाम करावे

* गरम, ताजे व पूर्ण शिजलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करावे

* तेलकट, तळलेल्‍या पदार्थ खाण्याचे शक्‍यतो टाळावे

* दिवसभरात गरम, कोमट पाणी प्‍यावे

* वर्दळीच्‍या ठिकाणी मास्‍क, रुमालाने तोंड झाकावे

* हात स्‍वच्‍छ धुण्यासह कोविडकाळातील सूचनांचे पालन करावे

* आहारात विविध रंगी व हंगामी फळांचा समावेश करावा

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलिभि: स्निग्धभोजिभि:।

शीतकाले वसन्ते च मन्दमेव ततो अन्यदा।।"

असा आरोग्‍य, व्‍यायामाचे महत्त्व विशद करणारा संस्‍कृत श्‍लोक आहे. या श्‍लोकात म्‍हटल्‍याप्रमाणे जी व्‍यक्‍ती सुदृढ आहे व दरदिवशी जेवण करते, अशा व्‍यक्‍तीने आपली निम्‍मी ऊर्जा व्‍यायामासाठी वापरली पाहिजे. हिवाळी हंगामात निम्‍मी ऊर्जा, तर उन्‍हाळा व पावसाळ्याच्‍या दिवसांमध्ये एकचतुर्थांश ऊर्जा व्‍यायामासाठी वापरली गेली पाहिजे.

exercise food time
Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका टाळायचांय? दररोज शंख वाजवा

''वातावरणातील बदलांमुळे आरोग्‍यविषयक तक्रारी वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे. विशेषतः विषाणूंचा प्रादुर्भाव वाढून साथरोगांचा फैलाव होण्याची शक्‍यता आहे. स्‍वतःची व परिसरातील स्‍वच्‍छता ठेवण्यासह व्‍यायाम व आहार चांगला ठेवत सर्वांनी निरोगी राहावे.'' - डॉ. राजश्री पाटील, अध्यक्षा, आयएमए नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.