एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिला प्रवाशांना राज्यात कुठेही अर्ध्या तिकिटात प्रवास करता येत आहे. राज्य सरकारने मार्च २०२३ मध्ये महिलांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांमध्ये या योजनेचाही समावेश करण्यात आला आहे.
या योजनेची अंमलबजावणी एप्रिल २०२३ पासून राज्यात सुरू झाली आहे. योजनेतील सवलतीची रक्कम राज्य सरकार एसटी महामंडळाला देणार आहे. खरेतर एसटी महामंडळातर्फे तीस प्रकारच्या विविध समाज घटकांना तीस ते शंभर टक्क्यांपर्यंत प्रवासात सवलत दिली जाते. एसटीच्या बसमधून दररोज जवळपास ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करत असतात.