Diwali 2023 : गरिबीला असं घराबाहेर काढतात या महिला, दिवाळीदिवशी गावभर ऐकू येतो सूप अन् काठीचा आवाज!

धान्य पाकडण्याच्या सूपाने दूर होते दारिद्र्य, अशी इथल्या गावकऱ्यांची समजूत आहे
Diwali 2023
Diwali 2023 esakal
Updated on

Diwali 2023

दिवाळी हा आनंदाचा सण आहे. दिवाळीच दिवे लावून एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला जातो. पण, भारतात असं एक गाव आहे जिथली प्रथा काहीशी वेगळी आहे.  

दिवाळी दिवशी घरांची सजावट केली जाते. या दिवशी लोक आपापल्या घरात दिवे लावतात. रंगीबेरंगी दिव्यांनी घर सजवतात आणि धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाची पूजा करतात. या दिवशी लोक सुख आणि समृद्धी मिळविण्यासाठी देवी लक्ष्मीची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात.

Diwali 2023
Diwali Holiday : दिवाळीच्या आजपासून सुट्या; २२ नोव्हेंबरला भरतील शाळा

पण बिहारमधील एका गावात दिवाळीच्या काळात एक अनोखी परंपरा पाळली जाते. या दिवशी घरातील महिला दारिद्र्याला घरातून हाकलून देतात आणि देवी लक्ष्मीचे आवाहन करतात.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ही परंपरा पूर्ण होते. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण राज्यात ही परंपरा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

काय आहे प्रथा

या गावातील सर्व महिला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पहाटेची वाट पाहतात. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर घरातील महिला शेणाने सारवलेल्या सुपावर काठीने मारत फिरते. घरातील कानाकोपऱ्यात हे सूप फिरवले जाते. केवळ घरात नाहीतर अंगणात, गोठ्यातही हे सूप फिरवून दु:ख, दारिद्र्य बाहेर जाऊदेत, बाहेरची लक्ष्मी घरात येऊदेत, अशी प्रार्थना म्हणली जाते.

Diwali 2023
Diwali Skin Care : दिवाळीमध्ये चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग, ट्राय करा ‘हे’ घरगुती फेसपॅक्स

अंगणातून फिरवून झाल्यावर गावातली सगळी मंडळी प्रत्येक घरातील सूप अन् काठी घेऊन गावाच्या वेशीवर माळावर येतात. अन् तिथे हे सूप अन् काठी जाळले जाते.

असे केल्याने घरातील सर्व दारिद्र्य सूपासह निघून जाते आणि अग्नीत जळून जाते. देवी लक्ष्मीसोबत सुख,शांती, समृद्धीचा गृहप्रवेश होतो, अशी मान्यता आहे.

Diwali 2023
Diwali Fashion Tips: दिवाळीत गोल्डन कलरच्या साडीसोबत या रंगांचे ब्लाउज घाला, दिसाल स्टायलिश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com