Diwali 2023 : दिवाळीत घरची साफसफाई करण्यासाठी या टिप्स फॉलो करा, घर दिसेल चकचकीत

तुम्हाला घरात व्हाइट वॉश करायचे असेल तर तुम्हाला २०-२५ दिवसाआधी सुरुवात करावी लागेल
Diwali 2023
Diwali 2023 esakal
Updated on

Diwali 2023 : दिवाळी हा भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. दिवाळीला अवघे काहीच दिवस उरले असून अनेकजण आतापासूनच साफसफाईला सुरुवात करतात. धार्मिक मान्यतेनुसार दिवाळीत साफसफाई केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न राहते. शिवाय घरसुद्धा प्रसन्न वाटू लागते.

तुम्हाला घरात व्हाइट वॉश करायचे असेल तर तुम्हाला २०-२५ दिवसाआधी सुरुवात करावी लागेल.

दिवाळीत साफसफाई करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

1) सगळ्यात आधी तुमच्या घरात असलेल्या निकामी गोष्टी वेगळ्या काढून घ्या. घरातील वापरात नसलेली भांडी, कपडे आणि चपला गरजू व्यक्तींना द्या.

2) घरातील वस्तू स्वच्छ करण्यासाठी कॉटनचे कपडे वापरा. सोबतच बेकिंग पावडर, अर्धा बकेट सर्फचे पाणी, व्हाइट व्हिनेगर, ब्रश, स्पाँज या सगळ्या वस्तू तुम्हाला स्वच्छता करताना कामी येतील.

Diwali 2023
Lifestyle Tips : Stress Free Weekend एन्जॉय करण्यासाठी या टिप्स करा फॉलो, आठवडाही जाईल मजेत

3) घरातील झुरळ काढण्यासाठी लांब स्टिकच्या ब्रशचा वापर करा. पंख्याची साफसफाई करण्यासाठी डिटर्जंटच्या पाण्याचा वापर करा. आधी कोरड्या कपड्याने पंखा साफ करा. नंतर कोरडा कपडा एकदा पाण्यात घालून साध्या पाण्याने पंखा पुसून घ्या. पंखा अगदी नवा दिसेल.

4) घरातील स्विच बोर्डची साफसफाई काही लोक वर्षभर करत नाहीत. स्विच बोर्ड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही डिटर्जंटच्या पाण्याचा वापर करू शकता. एक कपडा भिजवून तो व्यवस्थित पिळून घ्या. आणि या कापडाने स्विच बोर्ड स्वच्छ करा. स्विच स्वच्छ करताना मेन पॉवर ऑफ करावा. कारण पाण्यामुळे तुम्हाला करंट लागण्याचा धोका असतो.

Diwali 2023
Diwali Bonus: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आणखी गोड, मोदी सरकारने जाहीर केला बोनस

5) घरातील सगळ्या महागड्या शो पीस वस्तू, फोटो फ्रेम, पेंटिंग, सोफा सेट, बेड, फर्निचर एका कपड्याने किंवा पेपरने झाकून ठेवा. जेणेकरून स्वच्छ करताना धूळ या वस्तूंवर पडू नये.

दिवाळीत घराला रंग देण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

तुम्हाला दिवाळीत घराचे व्हाइट वॉश करायचे असेल तर योग्य रंगाची निवड करा. व्हाइट वॉश करण्याआधी घराच्या भिंती, दारे यांची डागडुजी करून घ्या. घराची पेंटिंग करण्यासाठी क्वॉलिटी पेंटचा वापर करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()