Diwali Makeup Tips : दिवाळीत सुंदर लूक करण्यासाठी 'या' मेकअप टिप्सची घ्या मदत

दिवाळीमध्ये आपला लूक सुंदर दिसावा आणि आपण सगळ्यांपेक्षा हटके दिसावे, असे अनेक महिलांना वाटते.
Diwali Makeup Tips
Diwali Makeup Tipsesakal
Updated on

Diwali Makeup Tips : दिवाळीचा आज तिसरा दिवस आहे. आज लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशीचा सण आहे. यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशीचा सण हे एकाच दिवशी आले आहेत. आज देवी लक्ष्मीची शुभ मुहूर्तावर पूजा केली जाते.

दिवाळी म्हटलं की, जिभेवर रेंगाळणारा फराळ, गोडाधोडाचे पदार्थ, नवे कपडे, सजावटीचे साहित्य, रांगोळ्या आणि गिफ्ट्स हे सगळ त्यात आलचं. दिवाळीमध्ये आपला लूक सुंदर दिसावा आपण सगळ्यांपेक्षा हटके दिसावे असे अनेक महिलांना वाटते. त्यासाठी मग मेकअपची खास मदत घेतली जाते.

आज खास लक्ष्मीपूजनासाठी आम्ही तुमचा लूक सुंदर करायला मदत करणार आहोत. त्यासाठी आम्ही खास मेकअपच्या टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स.

दिवाळीत सुंदर लूक करण्यासाठी या मेकअप टिप्सची घ्या मदत :

चेहरा स्वच्छ करा

सर्वात आधी तुमचा चेहरा स्वच्छ करा. त्यासाठी तुम्ही तुमचा कोणताही रोजच्या वापरातील फेसवॉशचा वापर करू शकता. तसेच, क्लिन्झिंग मिल्कने ही चेहरा स्वच्छ करू शकता.

मॉईश्चरायझर लावा

चेहरा छान स्वच्छ केल्यानंतर, आता चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावायला विसरू नका. जर तुमची कोरडी त्वचा असेल तर क्रीम बेस्ड मॉईश्चरायझर लावा जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जेलबेस्ड मॉईश्चरायझर लावा. मॉईश्चरायझर लावल्याने चेहरा छान हायड्रेटेड राहतो.

Diwali Makeup Tips
HD Makeup : ब्राईडसाठी परफेक्ट असणारा HD मेकअप काय आहे? याचे प्रमुख प्रकार घ्या जाणून

प्रायमरचा करा वापर

मॉईश्चरायझर चेहऱ्यावर सुकल्यानंतर आता कोणत्याही चांगल्या ब्रॅंडचे आणि क्वालिटीचे प्रायमर लावा. प्रायमरमुळे चेहऱ्यावर एक छान बेस तयार होतो. या बेसमुळे इतर मेकअप प्रॉडक्ट्सचा आपल्या चेहऱ्यावर थेट परिणाम होणार नाही.

बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम

दिवाळीच्या गडबडीमध्ये अनेकांना हेव्ही मेकअप करायला ही वेळ नसतो. त्यामुळे, गडबडीमध्ये होणारा झटपट आणि सुंदर मेकअप महिलांना आवडतो. जर तुम्हाला हेव्ही मेकअप नको असेल आणि लाईट मेकअप मात्र, तितकाच उठावदार हवा असेल तर बीबी क्रीम आणि सीसी क्रीम बेस्ट आहेत.

बीबी क्रीम आणि सीसी क्रीममुळे चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो. या ग्लोमुळे चेहऱ्याला मस्त चमक मिळते. या क्रीमपैकी कोणत्याही एका क्रीमचा वापर तुम्ही करू शकता. त्यानंतर, हायलायटर आणि ब्लशचा वापर करा.

Diwali Makeup Tips
BB And CC Creams : बीबी क्रीम आणि सीसी क्रीममध्ये फरक काय? दोन्हींचे ‘हे’ फायदे घ्या जाणून

लिपस्टिक आणि आयमेकअप

लिपस्टिक आणि आयमेकअप शिवाय तुमचा मेकअप अपूर्ण आहे. बीबी क्रीम किंवा सीसी क्रीमचा वापर केल्यानंतर ब्लश आणि हायलाटरचा वापर करा. त्यानंतर, तुमच्या आऊटफीटला मॅच होणाऱ्या लिपस्टिकचा वापर करा.

आता आयमेकअप बद्दल बोलायचे झाल्यास डोळ्यांना छान पैकी काजळ लावून घ्या. त्यानंतर, आयलायनर लावायला विसरू नका. तुमच्या आऊटफीटला मॅच होणारे आयलायनर तुम्ही लावू शकता. आता तुमचा लाईट मेकअप तयार आहे.

Diwali Makeup Tips
Makeup Remover : मेकअप रिमुव्हरसाठी कशाला पैसे खर्च करताय? घरच्या घरी हे ऑप्शन्स आहेत की!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.