तुम्हाला तुमच्या घराला जर कमी वेळात पूर्णपणे नवीन लूक द्यायचा असेल, तर तुम्ही खालील प्रकारे फुलांनी पटकन सजवू शकता. तुम्ही काही दिवसांपूर्वी घराला रंगरंगोटी आणि साफसफाई केली असेल, पण तरीही, फुलांनी घर सजवल्याशिवाय ते सुंदर दिसणार नाही. कमी वेळेत आणि कमी खर्चात तुम्ही तुमचे घर कसे सजवू शकता ते पहा.
दिवाळीत पडदे धुतले नसतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. पडद्यावर फुलं लावूनही तुम्ही त्याला नवा लुक देऊ शकता. यामुळे तुमच्या घराचे सौंदर्य आणखी वाढेल.
नवीन पद्धतीने रांगोळी काढायची असेल तर फुलांनी रांगोळी काढता येते. हे बनवायला खूप सोपे आहे. सजावटीशिवाय रांगोळीसाठी गुलाबाची फुलेही वापरू शकता. यासाठी सुंदर फुलांचा वापर करावा, जे दिसायलाही सुंदर असतात. यासाठी तुम्ही पांढरा, केशरी रंग वापरू शकता.
तुमच्या घरात फ्लॉवर पॉट्स असतील तर तुम्ही त्यांना नवीन लुक देऊ शकता. त्यात अनेक प्रकारची फुले लावून तुम्ही ते आकर्षक बनवू शकता. हे डेकोरेशन अधिक आकर्षक करण्यासाठी तुम्ही रेन लिली आणि अॅमेरेलीस लिलीची फुलेही लावू शकता.
दिवाळीत तुमच्या घराला नवा लुक द्यायचा असेल तर गुलाब आणि झेंडूच्या फुलांनी घर सजवा. ते पूर्णपणे आकर्षक दिसेल आणि फुलांच्या ताजेपणामुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न राहील.
दिवाळीत दरवाजे जर डेकोरेशनशिवाय असतील तर ते रिकामे दिसतात. त्यामुळे तुम्ही फुलांनी सजवू शकता. डेकोरेशनसाठी तुम्ही चमकदार लाल आणि गुलाबी, पिवळी किंवा पांढरी फुले घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.