Diwali 2023 : आली माझ्या घरी ही दिवाळी! या पद्धतीने सजवा देवघर

सोप्या आणि आकर्षक गोष्टींचा वापर करून आपण देवघर उत्तम प्रकारे सजवू शकतो.
Diwali 2023
Diwali 2023esakal
Updated on

Diwali 2023 : अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सर्वत्र दिवाळीची लगबग पहायला मिळतेयं. खास दिवाळीच्या शॉपिंगसाठी बाजारपेठ सजली आहे. घर सजावटीसाठी आकर्षक साहित्य, माळा, आकाशकंदील इत्यादी अनेक गोष्टी खरेदीसाठी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.

दिवाळीमध्ये आपण घराची सजावट करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करतो. ज्या प्रकारे आपण आकर्षक गोष्टींचा वापर करून घर सजवतो त्या प्रकारे आपण देवघर देखील सजवू शकतो. सोप्या आणि आकर्षक गोष्टींचा वापर करून आपण देवघर उत्तम प्रकारे सजवू शकतो.

आज आम्ही तुम्हाला खास दिवाळीमध्ये देवघर सजवण्यासाठी काही सोप्या टीप्स सांगणार आहोत. या टीप्सचा वापर करून तुम्ही तुमचे देवघर दिवाळीमध्ये नक्की सजवा.

हारांचा करा वापर

देवघर सजवण्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्य हारांचा उत्तम प्रकारे वापर करू शकता. देवघर छान प्रकारे सजवण्यासाठी तुम्ही देवघराला हार घालू शकता. मार्केटमध्ये विविध प्रकारचे, विविध डिझाईन्समधील हार उपलब्ध आहेत.

फुलांचे नैसर्गिक हार ही तुम्ही देवघराला घालू शकता. देवघर सजवण्यासाठी झेंडू, चाफा, शेवंती, गुलछडी इत्यादी प्रकारच्या फुलांचा वापर करा. या फुलांचे हार ही तुम्ही देवघराला लावू शकता.

Diwali 2023
Diwali Decoration : आली माझ्या बाल्कनीत ही दिवाळी; ‘या’ टिप्सने सजवा तुमची बाल्कनी

मातीचे दिवे

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. त्यामुळे, दिवे नसतील तर दिवाळी अपूर्ण आहे. मातीच्या दिव्यांचा वापर करून आपण देवघर उत्तम प्रकारे सजवू शकतो. देवघर आणि घरातील प्रत्येक खोलीत तुम्ही मातीच्या दिव्यांचा वापर सजावटीसाठी करू शकता.

तोरण लावा

घराच्या मुख्य दरवाजाला आपण दिवाळीत तोरण आवर्जून लावतो. त्यामुळे, घर सुंदर दिसते. देवघराला देखील तुम्ही तोरण लावू शकता. तोरणामुळे, देवघर आणखी सुंदर दिसण्यास मदत होईल.

बाजारात विविध प्रकारचे तोरण मिळतात. तुम्ही घरच्या घरी ही तोरण बनवू शकता, यासाठी विविध प्रकारच्या फुलांचा आणि पानांचा वापर तुम्ही करू शकता.

एलईडी लाईट्सचा करा वापर

घर सजावटीसाठी आपण एलईडी लाईटचा किंवा विविध प्रकारच्या लाईटच्या माळांचा वापर आवर्जून करतो. देवघर सजवण्यासाठी एलईडी लाईटचा वापर केल्याने देवघराच्या सौंदर्यात आणखी भर पडेल. देवघर सजवताना एलईडी लाईटचा जरूर वापर करा.

Diwali 2023
Diwali 2023 : दिवाळीत रांगोळी आणि दिव्याचे आहे खास महत्त्व; जाणून घ्या यामागील कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()