देशभरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विद्युत रोषणाईने मंदिरे आणि इमारती सजल्या आहेत. घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जात आहेत. तर घरांनाही नवे रंग रूप दिले जातेय.
दिवाळी हा दिव्यांचा सण, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण. या दिवसात भेटवस्तू देणं, फटाके, खरेदी या सगळ्यात देश मग्न असेल. देशभरात असे उत्साहाचे चित्र असताना भारतातल्या एका गावात दिवाळी साजरी केली जात नाही.
उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर गावातील लोक दिवाळीला उत्साही नसतात. ते त्यादिवशी काहीच खास करत नाहीत. उलट दिवाळी का आली असा प्रश्नच त्यांना पडतो. यामागे एक महत्त्वाचे कारणही आहे. या लोकांचे दिवाळी साजरे न करण्यामागील कारण काय आहे पाहुयात.
मदिहान तालुक्याच्या राजगढ भागातील अटारी गाव आणि त्याच्या आसपासची ७ ते ८ गावे दिवाळीवर बहिष्कार टाकतात. यामध्ये मटिहानी, मिशूनपूर, लालपूर, खोराडीह या गावांचाही समावेश आहे. या गावांमध्ये दिवाळी हा सण शोक दिन म्हणून साजरा केला जातो.
या गावांमध्ये 8000 च्या वर चौहान समाजाची लोक राहतात. चौहान समाजातील लोक अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळत आहे. पिढ्यानपिढ्या हा समाज आजही दिवाळीच्या दिवशी शोक व्यक्त करण्याची परंपरा जपत आहे.
ही प्रथा नक्की का पडली
ही कथा पृथ्वीराज चौहान यांच्याशी संबंधित आहे. खरेतर चौहान समाजातील लोक सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे वंशज मानतात. दिवाळीच्या दिवशी मुहम्मद घोरीने सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा खून केला होता, असे त्यांचे मत आहे. त्यांचा मृतदेह गंधार येथे नेऊन दफन करण्यात आला. त्यामुळे या दिवशी समाजातील लोक शोक करतात. अटारी गावात चौहान समाजाचे बहुतांश लोक राहतात.
चौहान समाजाचे अध्यक्ष धनीराम सांगतात की, या दिवशी आमच्या पूर्वज सम्राटांची महंमद घोरीने हत्या केली होती. म्हणूनच या दिवशी आम्ही आपल्या घरात दिवे लावत नाही आणि शोक करत नाही. दिवाळीऐवजी आम्ही कार्तिकी एकादशीच्या दिवशी (देव दिवाळी) दिवाळी साजरी करतो आणि त्या दिवशी घरांना रोषणाई करतो.
अटारी गावात चौहान समाजाचे बहुतांश लोक राहतात. येथील स्थानिक लोक त्यांच्या पूर्वजांची ही परंपरा आजही पाळत आहेत. एकादशीच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते.
गावातील रहिवाशी, राजगीर सिंह चौहान सांगतात की, पृथ्वीराज यांना आंधळे करून गझनीला नेण्यात आले. तेथे त्यांची हत्या करण्यात आली. दिवाळीच्या दिवशीच ही घटना घडली होती. त्यामुळे या घटनेवर आम्ही शोक व्यक्त करतो. त्यामुळे आम्ही दिवाळी साजरी करत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.