Diwali 2023 : बजेटवाली दिवाळी, प्लास्टिक कचऱ्यापासून अशा पद्धतीने घरीच बनवा रांगोळीचे साचे

तुम्ही फेसवॉशच्या बाटल्यांनी सुरेख रांगोळी काढू शकता
Diwali 2023
Diwali 2023 esakal
Updated on

Diwali 2023 : दर दिवाळीला रांगोळीचे साचे आणले अन् तू नेहमी ते खराब करतोस, असं आजी तिच्या दोन वर्षाच्या नातवाला म्हणत होती. कारण, तोही आईसारखी रांगोळी काढायची म्हणून मागे लागतो अन् साच्यात रांगोळी भरून ती घरभर विस्कटतो.

केवळ रांगोळीच नाहीतर ते साचेही कुठेही फेकून देतो. त्यामुळे प्रत्येकवेळी रांगोळी काढायची म्हटलं की गैरसोय होते. तुमच्या घरीही गेल्यावर्षीचे साचे सापडत नसतील तर या काही आयडीया वापरून तुम्ही घरीच रांगोळीचे साचे बनवू शकता. कसे ते पाहुयात.

Diwali 2023
रांगोळी स्पर्धेमध्ये राहुल चव्हाणचे यश

रिकाम्या बाटल्या

आपल्या घरात पाण्याच्या अनेक रिकाम्या प्लास्टीकच्या बाटल्या असतात. त्यांचा पुर्नवापर करून तुम्ही रांगोळीचा पेन बनवू शकता. यासाठी बाटलीच्या झाकणाला एक होल पाडावं लागेल. त्यानंतर त्यात रांगोळी भरून त्याचा वापर करू शकता.

तेल, फेसवॉशच्या बाटल्या

तुम्ही पॅराशूट अन् फेसवॉशच्या बाटल्यांचा वापरही करू शकता. या बाटल्या स्वच्छ धुवून सुकवून घ्या. त्यानंतर त्यात रांगोळी भरून तुम्ही त्यानेही रांगोळी काढू शकता.  

तुम्ही फेसवॉशच्या बाटल्यांनी सुरेख रांगोळी काढू शकता
तुम्ही फेसवॉशच्या बाटल्यांनी सुरेख रांगोळी काढू शकताesakal
Diwali 2023
Kareena Kapoor's Diwali: अरे दिवाळी आहे की होळी! जेह-तैमूरसोबत करिनानं काढली रांगोळी... फोटो व्हायरल

तुटलेली चाळण, गाळणं

आपल्या घरात अडगळीच्या खोलीत तुटलेली चाळण असतेच. त्या चाळणीचे कापड काढून तुम्ही प्लास्टिकच्या ग्लासला गुंडाळू शकता. यासाठी रबरचा वापर करू शकता. प्लास्टिकच्या छोट्या ग्लासला ही जाळीदार चाळण फिट करा आणि ग्लासमध्ये रांगोळी भरून तीचा वापर करा.

स्टिक आणि झाकण

संस्कारभारती रांगोळी काढायची असेल तर ठिपक्यांचा वापर करू शकता. ठिपके एकसारखे यावेत म्हणून आयस्क्रिमची स्टिक घ्या. त्याला एका सॉसच्या बाटलीचे टोपण लावून त्याने तुम्ही एकसारखे ठिपके पाडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.