Diwali 2023 : सीता स्वयंवरात श्री रामांनी तोडलेल्या धनुष्यबाणाचे पुढे काय झाले?

धनुष्यबाणाचे तीन तुकडे झाले त्यातील एक तुकडा भारतात आजही आहे
Diwali 2023
Diwali 2023esakal
Updated on

Diwali 2023 :  सीता मातेच्या स्वयंवराचा किस्सा तर सगळ्यांनाच माहिती आहे. सीतामातेचे वडिल राजा जनक यांनी राजसभेत घोषणा केली होती की, भगवान शिवाच्या धनुष्यावर जो बाणाची प्रंपच जोडू शकेल, त्याच्याशी सितेचा विवाह होईल. ते धनुष्य साक्षात भगवान शंकरांनी राजा जनक यांना दिले होते.  

सीता मातेच्या स्वयंवरात अनेक राजे होते. त्यांमध्ये रावणही होता. पण, शिवधनुष्य उचलणे कोणत्याच राजाला शक्य झाले नाही. तेव्हा प्रभू श्रीरामांनी हे धनुष्य उचलले आणि प्रपंचाला बाण लावताना त्याचे तुकडे झाले.

Diwali 2023
Lord Shri Ram : भगवान राम सीतेसोबत दररोज बसून मद्य प्यायचे; प्रसिद्ध लेखकाचं वादग्रस्त विधान

त्यानंतर श्री राम सीतेचा विवाह झाला. सीता माता अयोध्येला परतली अन् तिथून श्रीराम-सीता आणि लक्ष्मण यांना वनवासाला जावे लागले. श्री राम जानकी माता जिथे जिथे गेल्या तिथे एक तिर्थस्थान बनले. पण, त्या धनुष्यबाणाचे पुढे काय झाले याबद्दल कोणालाच फारशी माहिती नाही. ते धनुष्य कुठे आहे, त्याचे काय झाले हे आपण पाहुयात.

त्या धनुष्याचे काय झाले?

स्वयंवारातील शिव धनुष पंडित अरविंद त्रिपाठी यांनी रामचरित मानसमध्ये लिहिले आहे की, “लेत चढ़ावत खैंचत गाढ़ें। काहुं न लखा देख सबु ठाढ़ें । तेहि छन राम मध्य धनु तोरा। भरे भुवन धुनि घोर कठोरा “ 

याचा अर्थ असा होतो की, स्वयंवरात श्री रामांनी धनुष्यबाण हातात घेतले कधी, ते उचलून धरले कधी अन् त्यानी प्रपंच बांधण्याचा प्रयत्न करताना त्याचे तुकडे पडले. पण राजसभेतील उपस्थित लोकांनी फक्त श्रीरामांनी हातात धरलेले धनुष्यबाणच पाहिले.

Diwali 2023
Adipurush Jai Shri Ram Song: अजय-अतुलचा नादच खुळा! आदिपुरुषच्या 'जय श्री राम' गाण्यानं रिलिज होताच केला रेकॉर्ड...

शिव धनुष्याच्या 3 तुकड्यांचे काय झाले?

धार्मिक श्रद्धेनुसार असे मानले जाते की, भगवान राम जेव्हा धनुष्याच्या प्रपंच बांधत होते. तेव्हा धनुष्य अर्पण करताना शिवाचे धनुष्य तुटले. धनुष्याचा एक तुकडा आकाशात गेला आणि दुसरा तुकडा पाताळात गेला, परंतु तिसरा तुकडा जो धनुष्याचा मधला भाग होता.

तो पृथ्वीवर पडला. पृथ्वीवर पडलेला भाग नेपाळमध्ये आहे. हे मंदिर धनुष धाम म्हणून ओळखले जाते. हे मंदिर जनकपूरपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. शिवधनुष्याच्या तुकड्याची पूजा करण्यासाठी लोक येथे येतात.

नेपाळमध्ये हे मंदिर आहे
नेपाळमध्ये हे मंदिर आहेesakal
Diwali 2023
Shri Ram Temple : रामलल्लासाठी सुवर्ण सिंहासनाचा थाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.