Diwali 2023 : दिवाळीदिवशी घरात लावा ही झाडे, माता लक्ष्मी प्रसन्न होईल अन् नशिब होईल धन-धना-धन

काही वनस्पती माता लक्ष्मीला, तर काही श्री कुबेरांना आकर्षित करतात
Diwali 2023
Diwali 2023 esakal
Updated on

Diwali 2023 :

दिवाळीची तुम्ही जोरदार तयारी केली असेल. कपड्यांची खरेदी केल्या असतील. दिवाळीला काय काय खरेदी करायची याची लिस्ट तयार करत असाल. तर त्या यादीत तुम्हाला काही झाडांची नावेही लिहावी लागतील. कारण, दिवाळीच्या मुहूर्तावर काही रोपे घरात लावल्याने तुमचे नशिब पालटणार आहे.

दीपोत्सवाच्या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी शुभ मानली जाते. काही खास वनस्पतींची विशेष खरेदीही केली जात आहे. होय, दिवाळीच्या मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच आपण काही उपाय देखील केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते.

Diwali 2023
Diwali 2023 : दिवाळीच्या पूजेसाठी आणा मातेची अशीच मूर्ती, वर्षभर तिजोरी भरलेली राहील!

अशा परिस्थितीत वास्तुशास्त्राने काही अशा वनस्पतींबद्दल सांगितले आहे जे घरात लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी या रोपांची लागवड केल्याने देवी लक्ष्मी अधिक प्रसन्न होऊन सुख, समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देते.

ब्रह्म कमळ

ज्योतिषाचार्य पंडित विष्णू यांनी सांगितले की, दिवाळीच्या पूजेदरम्यान ब्रह्मकमळ वनस्पतीची पूजा केल्या बराच फरक पडतो. घरात सकारात्मक उर्जा टिकवून ठेवण्यासाठी ब्रह्मकमळाचे झाड लावावे. हे झाड घराच्या मध्यभागी ब्रह्मस्थानात लावावे.

Diwali 2023
Diwali Padwa 2023 : आज आहे दिवाळी पाडवा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

लक्ष्मी कमळ

लक्ष्मी कमळाचे रोप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. या वनस्पतीची पूजा केली जाते. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक घरात ती लावली जाते. आपल्या जीवनात लक्ष्मीचा अपार आशीर्वाद असतो आणि ही वनस्पती लक्ष्मीला आकर्षित करते.  घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला हे रोप लावणे फायदेशीर मानले जाते.

ही वनस्पती लक्ष्मीला आकर्षित करते
ही वनस्पती लक्ष्मीला आकर्षित करतेesakal
Diwali 2023
Sakal Vastu Expo: स्वप्नातले घर घेणाऱ्यांसाठी 'सकाळ'तर्फे खास ऑफर! येत्या शनिवारी - रविवारी 'या' संधीचा जरुर घ्या लाभ

कुबेर रक्षी

कुबेर रक्षी वनस्पती शुक्र ग्रह आणि संपत्तीची देवता कुबेर यांच्याशी संबंधित आहे. दिवाळीत कुबेर वनस्पतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात अडचणी येतात. ती निघून जाते. घराच्या आत नैऋत्य दिशेला हे रोप लावणे शास्त्रात चांगले आणि लाभदायक मानले जाते.

संपत्तीची देवता कुबेर यांचे हे झाड प्रतिक आहे
संपत्तीची देवता कुबेर यांचे हे झाड प्रतिक आहेesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.