Diwali 2023: लक्ष्मी पूजनसाठी वेगळा लूक हवाय? हे इअर रिंग्स नक्की ट्राय करुन पाहा

दिवाळीला सुंदर लूक हवा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा
Diwali
Diwali sakal
Updated on

यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे, त्यासाठी लोकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. पाच दिवस चालणाऱ्या दीपोत्सवात दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. या महान उत्सवाची सुरुवात धनत्रयोदशीच्या सणाने होते.

बाजारात अनेक प्रकारचे ड्रेसेस आणि ज्वेलरी आली आहे. पण त्यातून नक्की काय घ्याव हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच? बरं जी ज्वेलरी घेताना एक प्रश्न हाही असतो की ही मॅचिंग पण असावी आणि वेगवेगळ्या ड्रेसेस आणि लुकसाठी परफेक्ट देखील.

अशाच काही कानातल्यांच्या जोड्या ज्या मल्टी पर्पज तर असतीलच पण तुम्हाला रॉयल लुक देखील देतील.

1.क्रिस्टल चांदबाली

बाजारात अगदी मोठ्या दुकांनापासून तर रस्त्यावरच्या स्टॉल पर्यंत सगळीकडेच अशा पद्धतीचे कानातले आपल्याला दिसतील. अशी क्रिस्टल चांदबाली एका गोल्डन आउटफिटवर तुम्हाला रॉयल लुक देऊ शकेल.

Diwali
Women Fashion : उंची कमी असेल तर कुर्तीचे हे प्रकार नक्की ट्राय करा, लूक सुंदर दिसेल!

2. ऑक्सिडाईज स्टड्स

तसे कानातले बाजारात खूप आहेत पण आपल्याला हवे तसे मिळणे कधीतरी कठीण होऊन बसते. ऑक्सिडाईज कानातले हा एकमेव प्रकार असेल जो कॅज्यूअल, ऑफिस आणि एथेनिक वेअर तिघांवर जाईल; असे ऑक्सिडाईज स्टड्स तुमच्या साडी कुर्ता किंवा अनेकदा नॉर्मल ड्रेस वर देखील खुलून दिसतात.

3. कानाचे वेल आणि टेम्पल ज्वेलरी झुमके

एक गोल्डन किंवा मोतिया रंगाचा आउटफिट त्यावर गुलाबी रंगाची ओढणी बांधलेले केस आणि त्यावर टेम्पल ज्वेलरी असलेले झुमके आणि कानामागून केसात लावलेले लांब तीन पदरी वेल. बहुदा यानंतर एखाद्या स्टाईलीशनेच हा लुक तयार केलाय असेच वाटेल.

4. गोल्डन झुमके

बहुदा सुंदर सिल्कची साडी आणि त्यावर पूर्ण सोनेरी कानातले ह्या कॉम्बिनेशनला कुठेही तोड नाही. यात पूर्ण गोल्डन रंगाची टेम्पल किंवा अगदीच ऑक्सिडाईज ज्वेलरी देखील तुमचा लुक खुलवतील.

5. मीनाकारी वर्क असलेले लाल आणि हिरव्या पेस्टल रंगाचे कानातले

सध्या पेस्टल कलरचे ड्रेसेस घेण्याकडे अनेकांची पसंती दिसते त्यावर मिनाकारी केलेले लाल आणि हिरव्या रंगाचे कानातले किंवा तुमच्या आउटफिटला मॅच होणाऱ्या रंगाचे कानातले तुम्हाला ग्लॅमरस दिसायला मदत करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.