Diwali 2024 Day And Time: हिंदू धर्मात दिवाळी सणाला खुप महत्व आहे. भारतात दिवाळी सण मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे.
पण यंदा दिवाळीच्या तारखेबाबत गोंधळ उडाला आहे. यंदा दिवाळी ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर कधी साजरी होणार याबाबत खुप गोंधळ आहे. विश्व हिंदू परिषदेने दिवाळीच्या तारखांबाबत होणारा गोंधळ दूर केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी इंडिया टुडेला दिलेल्या निवेदनात सांगितले की यंदा दिवाळी ३१ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.