Diwali 2024 : ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर कधी आहे दिवाळी? लक्ष्मीपूजन, पाडवा अन् भाऊबिजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

कार्तिक अमावस्या कधी आहे? वहिपूजनाचा योग्य मुहूर्त कोणता जाणून घ्या
Diwali 2024
Diwali 2024 esakal
Updated on

Diwali 2024 :

दसरा झाल्यानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. दसऱ्याला सोन लुटल्यानंतर लोक दिवाळीच्या खरेदीला बाहेर पडतात. दिवाळीला मोठ्या आनंदाचा सण आहे. या सणाची प्रत्येकजण आतुरतेणे वाट पाहत असतो. हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळी जवळ आलीय हे तर सर्वांना माहितीये पण ती कधी आहे याची तारीख माहिती नाही. प्रत्येकवेळी कॅलेंडर पाहत बसू नका. जाणून घ्या संपूर्ण माहिती.   

दरवर्षी दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला साजरा केला जातो. यावेळी दिवाळीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. काही लोक ३१ ऑक्टोबरला दिवाळी साजरी होईल असे सांगत आहेत तर काही लोक १ नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगत आहेत.

कधी आहे अमावस्या? (Kartik Amavasya Date )

कॅलेंडरनुसार, कार्तिक अमावस्या ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.५२ वाजता सुरू होत आहे. ही तारीख १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.१६ वाजता संपेल.  कार्तिक अमावस्या शुक्रवार, १ नोव्हेंबर रोजी आहे. अमावस्या तिथीला प्रदोष व्यापिनी मुहूर्तावर दिवाळी पूजन करण्याचे शास्त्रानुसार आहे.

Diwali 2024
Diwali Special Railway: स्पेशल, दिवाळी उत्सव रेल्वेमुळे प्रवाशांना दिलासा! नाशिक रोड रेल्वेस्थानकात गर्दी

दिवाळीचे मुख्य पाच दिवस (Diwali Days)

धनत्रयोदशी - २८ ऑक्टोबर

नरक चतुर्दशी - ३१ ऑक्टोबर

लक्ष्मी पूजन- १ ऑक्टोबर

दिवाळी पाडवा - २ ऑक्टोबर

भाऊबीज - ३ ऑक्टोबर

Diwali 2024
Diwali Faral : दिवाळीच्या फराळाच्या पदार्थात किती कॅलरीज असतात? डॉक्टर सांगतात..

 

श्री लक्ष्मीपूजन मुहूर्त (Diwali Laxmipujan Muhurta)

शुक्रवार दि.१ नोव्हेंबर रोजी सायं. ६.०४ ते रा.८.३५ पर्यंत. या प्रदोष काळात श्री लक्ष्मीपूजन करावे. तसेच रा.९.१२ ते १०.४७ पर्यंत. उ.रा. १२.२२ ते ३.३२ प. शुभ व अमृत योग असून या शुभ काळात श्री लक्ष्मीपूजन व वहीपूजन करावे.

Diwali 2024
Diwali and Business : उलाढाल वाढली, गोडवा वाढला..

बलिप्रतिपदेचे वहीपूजन

शनिवार दि.२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.०७ ते ९.३२ प. शुभ आणि दुपारी १.४७ ते सायं. ४.३७ - प. लाभ व अमृत मुहूर्त आहेत. तसेच सायं. ६.०३ - ते रात्री ७.३७ पर्यंत लाभ आणि रात्री ९.१२ ते २ उ.रात्री १२.२२ पर्यंत शुभ व अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळात वहीपूजन करावे.

 

लक्ष्मीपूजन कधी करावे

या वर्षी गुरुवार दि.३१ ऑक्टोबर २०२४ रोजी आश्विन कृ. चतुर्दशी दुपारी ३.५२ वा. समाप्त होत आहे. त्यानंतर अमावास्येस प्रारंभ होत असून शुक्रवार दि.१ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.१६ वाजता अमावास्या समाप्ती आहे. दि.३१ ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावास्येची व्याप्ती अधिक असून दि. १ नोव्हेंबर रोजी प्रदोष काळात अमावास्येची व्याप्ती अल्पकाळ आहे.

या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावास्येची व्याप्ती कमी- अधिक असता दुसरे दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी श्री लक्ष्मीपूजन करावे असे धर्मसिंधु, पुरुषार्थ चिंतामणी, तिथीनिर्णय, व्रतपर्व विवेक इ. धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे.

म्हणून शुक्रवार दि.१ नोव्हेंबर रोजी श्री लक्ष्मीपूजन दिले आहे. दि.१ नोव्हेंबर रोजी अमावास्या आणि प्रतिपदा यांचे युग्म आहे व या युग्मास महत्त्व द्यावे असे वचन असल्यामुळे प्रतिपदायुक्त अमावास्येच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि.१ नोव्हेंबर २०२४ रोजी दिवाळी साजरी करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.